शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आईसलँडमधील पेट्रोलची किंमत पाहून गाssर पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 13:34 IST

गेल्या महिन्यात पेट्रोल दरवाढीमुळे भारतीय जनता होरपळली होती

मुंबई: गेल्या महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. या दरवाढीनं सामान्य जनता चांगलीच होरपळली होती. त्यानंतर इंधनाच्या दरात होणारी वाढ थांबली आणि लोकांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या दोन आठवड्यांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली. यामुळे सर्वसामान्यांना हायसं वाटलं. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढू लागताच भारतीयांचं महिन्याचं आर्थिक गणित कोलमडू लागतं. मात्र जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर भारतापेक्षा जास्त आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा दर 84.06 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर एक लिटर डिझेलसाठी 72.13 रुपये मोजावे लागत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मुंबई पेट्रोलचा दर 86 रुपयांच्या वर गेला होता. मात्र हळूहळू दररोज काही पैशांनी पेट्रोल स्वस्त झालं. सध्या फुटबॉलचा फिव्हर जोरात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या काही देशांमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 100 पेक्षा अधिक रुपये मोजावे लागतात. आईसलँड या थंड प्रदेशातील देशात पेट्रोलची किंमत तब्बल 141.96 रुपये आहे. तर डेन्मार्कमध्ये पेट्रोलसाठी 126.95 रुपये मोजावे लागतात. सध्या 32 देश फिफा वर्ल्ड कपम खेळत आहेत. या देशांपैकी इराणमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. इराणमध्ये पेट्रोलचा दर 19.11 रुपये इतका आहे. फुटबॉल विश्वचषकात सहभागी झालेल्या देशांमधील पेट्रोल दर:आईसलँड- 141.96 रुपयेडेन्मार्क - 126.95 रुपये पोर्तुगाल- 124.90 रुपये फ्रान्स- 122.17 रुपये स्वीडन- 119.44 रुपये बेल्जियम- 117.39 रुपये जर्मनी- 116.71 रुपये इंग्लंड- 116.03 रुपये क्रोएशिया- 111.25 रुपये स्वित्झर्लंड- 111.25 रुपये उरुग्वे- 109.20 रुपये स्पेन- 104.42 रुपये सर्बिया- 103.06 रुपये दक्षिण कोरिया- 99.65 रुपये पोलंड- 93.50 रुपये जपान- 92.14 रुपये सेनेगल- 83.95 रुपये ब्राझील- 83.27 रुपये कोस्टारिका- 81.90 रुपये मोरोक्को- 81.22 रुपये पेरु- 75.08 रुपये ऑस्ट्रेलिया- 74.39 रुपये अर्जेंटिना- 68.25 रुपये मेक्सिको- 67.57 रुपये पनामा- 61.43 रुपये कोलंबिया- 55.28 रुपये रशिया- 48.46 रुपये ट्युनेशिया- 48.46 रुपये सौदी अरेबिया- 36.86 रुपये इजिप्त- 29.35 रुपये नायजेरिया- 28.67 रुपये इराण- 19.11 रुपये  

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलIranइराणCrude Oilखनिज तेल