शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

रशियातील भरपगारी रजेच्या मुदतीत ११ मेपर्यंत वाढ, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 06:51 IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रीय स्तरावरील भरपगारी रजेच्या मुदतीत ११ मेपर्यंत वाढ केली आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मॉस्को : कोरोना साथ निवळण्याचे नाव घेत नसल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रीय स्तरावरील भरपगारी रजेच्या मुदतीत ११ मेपर्यंत वाढ केली आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.यासंदर्भात मंगळवारी पुतीन यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, रशिया कोरोना विषाणूविरोधातील लढ्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या साथीच्या फैलावाने आता शिखर गाठण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आरोग्याला असलेला प्रचंड धोका टाळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जाहीर केलेल्या भरपगारी रजेच्या कालावधीत ११मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.कोरोना साथीला आळा घालण्यासाठी रशियात लागू केलेला लॉकडाऊन १२ मेपासून टप्प्याटप्प्याने मागे घेण्यासाठी एक कृती आराखडा ५मेपर्यंत तयार करा, कोरोनामुळे देशाचे झालेले प्रचंड आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी पावले उचलावीत असे आदेश पुतीन यांनी सरकारला दिले आहेत.या साथीमुळे रशियात ३० मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा जाहीर करण्यात आली होती तसेच सर्व उद्योगधंद्यांचे काम स्थगित करण्यात आले. कोरोनाच्या फैलावाबाबत पुतीन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती.>कोरोना रुग्णांचीसंख्या ९३ हजारांवररशियामध्ये कोरानाची अजिबात लागण न झालेले विभाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र दक्षतेचा उपाय म्हणून तिथेही काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत.या देशात कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजारांहून अधिक झाली आहे. मॉस्कोमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी एक नवीन रुग्णालय तातडीने बांधण्यात आले. त्यात सध्या २० रुग्णांना ठेवण्यातआले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशिया