शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गाताना उभी न राहिल्यानं गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 09:48 IST

आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करा; गायिकेच्या पतीची मागणी

पाकिस्तान: गर्भवती गायिका गाताना उभी न राहिल्यानं तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. सिंधमधील लरकानामध्ये एका मैफिलीत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गायिकेच्या पतीनं केली आहे.सिंधमधील कांगा गावात आयोजित करण्यात आलेल्या एका मैफिलीत २४ वर्षांची समिना समून गाणं सादर करत होती. गर्भवती असल्यानं गाताना उभं राहणं समिनाला शक्य नव्हतं. त्यामुळे ती बसून गाणं होती. यावेळी उपस्थित श्रोत्यांपैकी काहीजण स्टेजजवळ येऊन पैशांची उधळण करत होते. यावेळी स्टेजजवळ आलेला एकजण तिला उभं राहून गाण्यास सांगू लागला. तेव्हा समिना काहीशा अनिच्छेनं उभं राहण्याचा प्रयत्न करु लागली. समिना उभी राहताच तिला उभं राहण्यास सांगणाऱ्या व्यक्तीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. 

अवघ्या काही सेकंदांमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. यानंतर समिनाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. समिनावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव तारिक अहमद जतोई असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तारिकला पोलिसांनी अटक केली आहे. तारिकविरोधात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समिनाच्या पतीनं केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान