शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Video : इस्लामाबादमध्ये लागले संजय राऊत यांच्या भाषणाचे पोस्टर; पाकिस्तानचा जळफळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:13 IST

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.

मुंबई : जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचे कलम 370 रद्द करताना राज्यसभेमध्ये संजय राऊत यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी आज जम्मू काश्मीर घेतलेय, उद्या बलुचिस्तान आणि पीओकेसुद्धा ताब्यात घेऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे आणि राऊतांच्या फोटोचे पोस्टर इस्लामाबादमध्ये लागले आणि एकच खळबळ उडाली. 

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये जोरदार भाषण करून केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. राज्यसभेत आणि लोकसभेतही हा प्रस्ताव बहुमताने मंजूरही करण्यात आला. 

राऊत यांचे भाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्लामाबादमध्ये एकच खळबळ उडाली. हमरस्त्यावर जागोजागी राऊत यांच्या भाषणातील वाक्य आणि लोकसभेत बोलतानाचा फोटो छापलेले पोस्टर लागले होते. हे एका पाकिस्तानी युवकाच्या लक्षात आले. यानंतर पाकिस्तानात हे पोस्टर लावणारा कोण, असा सवाल उठू लागला आहे. 

इस्लामाबादमध्ये साजिद नावाच्या एका तरुणाने एक व्हिडीओ आज फेसबुकवर पोस्ट केला आहे. इस्लामाबादमध्ये प्रेस क्लब एफ-6 च्या समोरच्या रस्त्यावर प्रत्येक पोलवर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर ‘MAHA-BHARAT- A Step Forward’ – असे लिहिले आहे.

राऊतांचे भाषण ''कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. हे कलम म्हणजे गेल्या 70 वर्षांपासून देश आणि संविधानावर लागलेला डाग होता. तो आज धुवून निघाला आहे. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आपल्या पूर्वजांनी पाहिले होते. ते आज पूर्ण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज स्वर्गातून अमित शहांचे कौतुक करत करत असतील.'' अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहांचे कौतुक केले होते.  

टॅग्स :Article 370कलम 370Sanjay Rautसंजय राऊतPakistanपाकिस्तान