शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 10:32 IST

प्रश्नावर लवकरच तोडगा : अदर पूनावाला

ठळक मुद्देभारतात बहुतांश लोक कोविशिल्ड लस घेत आहेत. ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्या प्रवाशाला युरोपमध्ये प्रवेश दिला जाईल का, याबद्दल सध्या तरी संदिग्धताच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली व भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड लस घेतलेल्या असंख्य भारतीयांना यापुढे युरोपमध्ये कदाचित प्रवास करता येणार नाही. ज्या लसींना युरोपीय समुदायाने मंजुरी दिली आहे, त्यामध्ये कोविशिल्डचे नाव नसल्यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे.युरोपीय समुदायाने आतापर्यंत कोमिर्नाती (फायझर/ बायोएनटेक), मॉडेर्ना, वॅक्सझेर्वरिया (अ‍ॅस्ट्राझेनेका- ऑक्सफर्ड विद्यापीठ), जॅनस्सेन (जॉन्सन अँड जॉन्सन) या चार कोरोना प्रतिबंधक लसींनाच मान्यता दिली आहे. कोविशिल्ड व वॅक्सझेर्वरिया या दोन्ही लसी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठानेच विकसित केल्या आहेत. मात्र भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित होणाऱ्या कोविशिल्ड लसीला युरोपीय समुदायाने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र वॅक्सझेर्वरिया लसीचे उत्पादन ब्रिटनमध्येच होते. त्यामुळे युरोपमध्ये तिला अडसर आलेला नाही. 

भारतात बहुतांश लोक कोविशिल्ड लस घेत आहेत. ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्या प्रवाशाला युरोपमध्ये प्रवेश दिला जाईल का, याबद्दल सध्या तरी संदिग्धताच आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे लसींच्या वाटपासाठी राबविण्यात येणाऱ्या कोवॅक्स कार्यक्रमामध्ये कोविशिल्डचा समावेश आहे. अशा मान्यताप्राप्त लसीबाबत युरोपीय समुदाय अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रश्नावर लवकरच तोडगा : अदर पूनावाला

असंख्य भारतीयांनी कोविशिल्ड लस घेतली असून त्यांना युरोपला जाण्यात अडचणी येत आहेत. हा प्रश्न मी संबंधितांकडे मांडला असून नियंत्रक व राजनैतिक स्तरावर लवकरच त्याबाबत तोडगा निघेल, अशी आशा सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईAdar Poonawallaअदर पूनावाला