शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चार वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता; मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना केले सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:58 IST

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

वाॅशिंंग्टन : पुढील चार वर्षांत जगभरात कोरोनासारखी आणखी एखादी मोठी साथ येण्याची १० ते १५ टक्के शक्यता आहे, असा दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केला. एका अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

ते म्हणाले की, संकटांना तोंड देण्यासाठी अधिक पूर्वतयारी केली पाहिजे. पण, लोकांनी तशी तयारी केलेली दिसत नाही. कोरोनासारखी भीषण साथ भविष्यात पसरली, तर तिला रोखण्यास जग सज्ज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

आरोग्य धोरण कसे असावे?बिल गेट्स यांनी २०२२मध्ये आगामी काळातील साथ कशी रोखावी या विषयावर एक पुस्तक लिहिले.साथी, तसेच विविध आजारांना रोखण्यासाठी कशा प्रकारचे जागतिक आरोग्य धोरण असावे याविषयीची आपली मते गेट्स यांनी मांडली.

२०१५ मधील भाकीत खरे ठरलेजगात पसरणाऱ्या साथी व त्यापासून मानवी जीवनाला असलेला धोका, याबाबत बिल गेट्स अनेक वर्षांपासून लोकजागृती करत आहेत. २०१५ साली टेड टॉक या कार्यक्रमात गेट्स यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, प्राणघातक साथीचा मुकाबला करण्यासाठी जगाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही.त्यांनी व्यक्त केलेली ही भीती कोरोनाच्या साथीमध्ये खरी ठरली. नोव्हेंबर २०१९मध्ये सुरू झालेली कोरोनाची साथ काही महिन्यांत जगभरात पसरली. आतापर्यंत कोरोनामुळे ७ लाख १० हजार लोकांचा मृत्यू झाला.कोरोनासारखी एखादी प्राणघातक साथ पुन्हा पसरली, तर तिला रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सध्यातरी कोणत्याही देशाकडे दिसत नाही. ही वस्तुस्थिती गेट्स यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तीला दिसत असल्याने ते यासंदर्भात सर्वांना सतर्क करण्याचे काम करत आहेत. 

पूर्वीच्याच चुकांची होते पुनरावृत्ती, राजकीय इच्छाशक्तीचा अभावमायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जागतिक सहकार्य व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे साथींवर नियंत्रण मिळविणे कठीण जाते.आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबद्दल जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतला व त्या साधनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले तर अनेक अडचणी दूर करता येतील.मात्र तसे न होता पूर्वी केलेल्या चुकांची अनेक देश पुनरावृत्ती करत आहेत असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी सांगितले. 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसHealthआरोग्य