शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये राजकीय भूकंप; के पी ओली यांच्या सांगण्यावरून अचानक संसद भंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 18:01 IST

Nepal Politics: राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १० मे रोजी होणार आहे.

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट उत्पन्न झाले आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद भंग करण्यात आली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने रविवारी दुपारी याबाबत घोषणा केली असून पुढील वर्षी एप्रिल मे मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. 

राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १० मे रोजी होणार आहे. याआधी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी रविवारी अचानक कॅबिनेट बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी संसद भंग करण्याचा निर्णय घेतला होता. 

सत्ताधारी पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने ओली यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. हा निर्णय घाईगडबडीत घेण्यात आल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच लोकशाहीच्या विरोधात असून देशाला मागे नेणारा असल्याचा आरोप केला आहे. 

राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार अनुच्छेद ७६, खंड १:७ आणि अनुच्छेद 85 नुसार संसद भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाला मतभेदांनी ग्रासले आहे. गेल्या काही काळापासून पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. एक गट ओली यांच्या बाजुला आहे तर दुसरा गट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्प दहल प्रचंड यांच्या बाजुचा आहे. महत्वाचे म्हणजे बहुमत मिळाल्यानंतर जो पंतप्रधान होतो त्याला संसद भंग करण्याचा अधिकार नाही. यामुळे नवे सरकार बनण्याची शक्यता असताना संसद भंग करता नये, असे काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळ