शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Apple डिवाइसच्या माध्यमातून एक्स गर्लफ्रेन्डला केलं ट्रॅक, खुलासा झाला तेव्हा पोलिसही चक्रावले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 19:04 IST

अॅपल एअरटॅगचा वापर करून २७ वर्षीय व्यक्तीनं केला हा कारनामा…

तंत्रज्ञानाचा कोण कुठे कसा वापर करेल याबाबत काहीही सांगता येत नाही. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अॅपल एअरटॅगद्वारे एका व्यक्तीनं आपल्या एक्स गर्लफ्रेन्डला ट्रॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.  ही घटना अमेरिकेतील असून २७ वर्षीय झेविअर मॅगारिन हा आपल्या एक्स गर्लफ्रेन्डचं लोकेशन ट्रॅक करून तिला सतावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी त्यानं अॅपलच्या एअरटॅगचा वापर केला. इतकंच नाही कोणाला याची माहिती मिळू नये यासाठी त्यानं ते डिव्हाईस तिच्या कारच्या खाली इन्स्टॉल केलं.

सीबीएस न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार AirTag च्या बीपिंग साऊंडमुळे तिला ट्रॅक केलं जात असल्याची माहिती मिळाली. रिपोर्टनुसार झेविअर आणि त्याच्या गर्लफ्रेन्डनं मार्च महिन्यात ब्रेकअप केलं होतं. त्याच्यानंतरच त्या पोलीस कर्मचाऱ्यानं तिच्या गाडीखाली एअरटॅग इन्स्टॉल केलं. काही आठवडे तो तिला मेसेज करून लोकेशनबद्दल प्रश्न विचारत होता. परंतु काही दिवसांनंतर त्यानंच तिला मेसेज करून एअरटॅग इन्स्टॉल केल्याची माहिती दिल्याचंही सांगण्यात आलं.

तपासादरम्यान तिच्या कारमध्ये लावण्यात आलेला एअरटॅग त्या मुलाच्या खासगी ईमेल आयडीवर रजिस्टर असल्याचं दिसून आलं. तिच्या कारमध्ये रिअर बम्परच्या आत हेवी ड्युटी टेपनं एअरटॅग चिकटवून ठेवल्याचंही पोलिसांना दिसून आलं. दरम्यान, यानंतर त्या व्यक्तीवर ट्रॅकिंग डिव्हाईस लावून पाठलाग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याची हकालपट्टीही करण्यात आली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी