शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

इस्लामाबादमध्ये आंदोलक आणि पोलिसांमधल्या संघर्षाला हिंसक वळण, 10 जणांचा मृत्यू तर 250 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 09:06 IST

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली होती

ठळक मुद्दे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली होती.आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला.

इस्लामाबाद- पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरू केली होती. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला. या कारवाईत 25 जणांचा मृत्यू झाला असून, 250 जण जखमी झाले आहेत. 

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना सरकारला दिल्यानंतर आज पोलीस आणि निमलष्करी दलाने फैजाबादमधील आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी लाठीमार केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. आंदोनकर्त्यांनी या भागातील दुकानंसुद्धा बंद केली.

पाकिस्तानमधील तहरीक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह या संघटनेकडून गेल्या २० दिवसांपासून इस्लामाबादमध्ये धरणं आंदोलनं सुरू आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादला जाणारे महामार्ग अडवून धरले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठा खोळंबा झाला असून पाकिस्तानच्या राजधानीची कोंडी झाली आहे. पाकिस्तान सरकारने फेसबुक, ट्विटर, युट्यूब या सोशल मीडिया साइट्सही ब्लॉक केल्या आहेत. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्याचं प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया साइट्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर धरणं आंदोलन करुन वाहतूक रोखून धरणाऱ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईचं प्रक्षेपण न करण्याच्या सूचना सरकारने सर्व वृत्तवाहिन्यांना दिल्या आहेत. मात्र जियोसह काही वृत्तवाहिन्यांनी या कारवाईचे प्रक्षेपण केलं.  

नेमकं प्रकरण काय ?

सप्टेंबर 2017 मध्ये संमत झालेल्या निवडणूक कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात तहरीक-ए-लब्बैक संघटना रस्त्यावर उतरली आहे. कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. निवडणूक कायद्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे मोहम्मद पैगंबर यांच्या सर्वोच्चतेला आव्हान देण्यात आल्याचा, या संघटनेचा आक्षेप आहे. पण ही केवळ अनावधानाने झालेली चूक असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. सरकारने एका कायद्याच्या मदतीने यामध्ये सुधारणा केली आहे. पण तरीही आंदोलक कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिस