शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोरोनाच्या निर्बंधांना विरोध करणाऱ्या आंदोलकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न, जर्मनीत पोलिसांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 05:39 IST

पोलिसांनी या घटनेची टिष्ट्वटरवरून माहिती देताना सांगितले की, अनेक लोक संसदेसमोर लावलेले अवरोधक तोडून राईशटॅगच्या (जर्मन संसदेच्या) पायऱ्यांवर चढले; परंतु त्यांना आत घुसण्यापासून रोखण्यात आले.

बर्लिन : कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांनी जर्मनी ढवळून निघाली असून, शनिवारी आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले व बळाचा वापर करून तेथून हुसकावून लावले.मास्क घालणे, डिस्टन्सिंग पाळणे, अशा उपाययोजनांना विरोध करण्यासाठी शनिवारी दिवसभर हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. बर्लिनच्या आसपास मिरवणुका काढणाºया निदर्शकांना पोलिसांनी रस्त्यातच रोखण्याचा प्रयत्न केला होता; परंतु काही आंदोलक राजधानीच्या भव्य ब्रँडनबर्ग गेटजवळ रॅली काढण्याचा प्रयत्न करीत होते.पोलिसांनी या घटनेची टिष्ट्वटरवरून माहिती देताना सांगितले की, अनेक लोक संसदेसमोर लावलेले अवरोधक तोडून राईशटॅगच्या (जर्मन संसदेच्या) पायऱ्यांवर चढले; परंतु त्यांना आत घुसण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तसेच बाटल्याही फेकल्या. त्यानंतर त्यांना बळाचा वापर करून तेथून हटवण्यात आले. अनेक जण ध्वज घेऊन तेथे पळत असल्याचे यासंबंधीच्या एका फुटेजमध्ये दिसते.गृहमंत्री होर्स्ट सिहोफर यांनी या घटनेचा निषेध केला असून, आंदोलकांनी संसदेचा मान ठेवायला हवा. हा देश उदारमतवादी लोकशाहीचे प्रतीक आहे. दंगेखोरांनी या ठिकाणी केलेले कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच हजारो आंदोलकांनी रशियन दूतावासाबाहेर जमून तेथेही दगडफेक केली होती, तसेच बाटल्या फेकल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ३०० जणांना गजाआड केले होते.बर्लिनच्या प्रांतीय सरकारने या निषेधांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरू शकतात आणि मास्क वापरण्यासह अनेक नियम पायदळी तुडवू शकतात, हे ध्यानात घेऊन बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टानेही या आंदोलकांना डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, पोलिसांनी आंदोलकांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते व मार्च न काढण्याचे आवाहन केले होते. तरीही यावेळी सुमारे ३८,००० हून अधिक लोक जमले होते. त्यांनी अनेक विषयांवर आपला रोष व्यक्त केला. लसीकरण, फेस मास्क व जर्मन सरकारविरोधात सर्वसाधारणपणे त्यांनी विरोध प्रकट केला. यावेळी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा निषेध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट परिधान केलेले होते. यावेळी डच सीमेवरूनही काही जण आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले होते.‘विद्यमान राजकीय व्यवस्था संपुष्टात आणावी’५७ वर्षीय एक आंदोलक उवे बाचमन याने सांगितले की, मला मोकळे बोलण्याचा, तसेच मास्क न घालण्याचा अधिकार आहे. कोरोनाची भीती असणाºयांबाबत मला आदर आहे; परंतु या महामारीच्या मागे काहीतरी वेगळेच आहे, असे तो म्हणाला.अन्य एका आंदोलनकर्त्याने सांगितले की, जर्मनीची सध्याची राजकीय व्यवस्था संपुष्टात यावी व १८७१ च्या घटनेकडे पुन्हा परतावे. कारण देशाची सध्याची राजकीय स्थिती बेकायदेशीर आहे.

टॅग्स :Germanyजर्मनीInternationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्या