शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्वान आणि घोड्यांना पेन्शन देणार 'हा' देश; संसदेत आणला जाणार कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:32 IST

Poland Plans to Give Pensions For Dogs Horses: जगात जवळपास सर्वच देशांमध्ये श्वान आणि घोडे देशाच्या सेवेसाठी आपलं महत्वपूर्ण योगदान देतात. प्रत्येक अत्यावश्यक घटनेत श्वानाची मदत होते.

Poland Plans to Give Pensions For Dogs Horses: जगात जवळपास सर्वच देशांमध्ये श्वान आणि घोडे देशाच्या सेवेसाठी आपलं महत्वपूर्ण योगदान देतात. प्रत्येक अत्यावश्यक घटनेत श्वानाची मदत होते. इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकेलेल्यांना शोधण्याचं काम असो, चोरांचा मागोवा घेणं असो किंवा मग ड्रग्ज, स्फोटकांचा शोध लावणं असो या सर्व तपासात श्वानांची मदत प्रत्येक देशाची तपास यंत्रणा घेत असते. तर देशाच्या राजनैतिक कार्यक्रम आणि ताफ्यात घोड्यांचा समावेश असतो. शासकीय सेवा देणाऱ्या प्राण्यांना सरकारकडून जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली जाते. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर या प्राण्यांकडे कुणी लक्ष देत नाही. सरकार देखील सेवानिवृत्त झालेल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करतं. पण युरोपातील पोलंड या देशानं एक नवा पायंडा घातला आहे. 

पोलंड पोलीस, बॉर्डर गार्ड आणि लष्करी सेवेतील सेवानिवृत्त होणाऱ्या श्वान, घोड्यांना पेन्शन सेवा सुरु करण्याची योजना पोलंड सरकारनं तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशासाठी सेवा दिल्यानंतरही प्राण्यांची योग्य काळजी घेतली जाईल यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. पोलंडमध्ये सध्या सरकारी सेवेतील श्वान आणि घोडे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर कोणताही खर्च करण्यात येत नाही. त्यांना इतर संस्थांकडे सोपविण्यात येतं किंवा दक्तक घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांकडे प्राण्यांना सोपविण्यात येतं. 

सेवानिवृत्त झाल्यानंतर प्राण्यांना मिळणार पेन्शनसुरक्षा दल आणि पोलीस दलातील सदस्यांच्या मागणीनंतर गृह मंत्रालयानं नव्या कायद्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पोलंड देशासाठी सेवा देणाऱ्या श्वान आणि घोड्यांना या योजनेतून अधिकृत दर्जा आणि पेंशन सुविधा मिळणार आहे. सेवानिवृत्त झालेल्या प्राण्यांच्या देखभालीसाठीचा खर्च संबंधित प्राण्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार आहे. पण पेन्शन म्हणून दिली जाणारी रक्कम प्राण्यांच्या देखभालीवरच खर्च करण्याची अट यात असणार आहे. देशासाठी सेवा देणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणारा कायदा करणं ही देशाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे या कायद्याला सर्व सदनातील सर्व सदस्यांची मंजुरी मिळायला हवी, असं गृहमंत्री मॉरिस कमिन्सकी म्हणाले आहेत. या वर्षाच्या अखेरीस हे विधेयक पोलंड देशाच्या संसदेत मांडलं जाणार आहे. 

पोलंडमधील १२०० श्वानांना होणार फायदापोलंड सरकारच्या नव्या कायद्यामुळे देशासाठी सध्या सेवा देत असलेल्या जवळपास १२०० श्वान आणि ६० हून अधिक घोड्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, दरवर्षी जवळपास १० टक्के प्राणी सेवानिवृत्त होतात. यात श्वानांमध्ये जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यांचा वैद्यकीय आणि देखभाल खर्च खूप मोठा असतो. त्यामुळे पेन्शन योजनेमुळे श्वानांना खूप मदत मिळणार आहे.  

टॅग्स :dogकुत्राAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारInternationalआंतरराष्ट्रीयPensionनिवृत्ती वेतन