शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 06:51 IST

इस्लामाबाद हायकोर्टात काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

- डॉ. खुशालचंद बाहेतीपाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा परदेशी प्रदेश आहे आणि त्यावर पाकिस्तानचे कोणतेही अधिकार नाहीत, अशी कबुली स्वतः पाकिस्ताननेच   इस्लामाबाद हायकोर्टासमोर दिली आहे. 

इस्लामाबाद हायकोर्टात काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू होती. रावळपिंडी येथील  घरातून १५ मे रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले हाेते. त्यांच्या पत्नीने हायकोर्टात  पाक गुप्तचरांनी अपहरण केल्याचा दावा करत हॅबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानचे अतिरिक्त ॲटर्नी जनरल यांनी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कयानी यांच्यासमोर युक्तिवाद केला की, फरहाद शाह पीओके पोलिसांच्या कोठडीत आहेत व त्यांना इस्लामाबाद हायकोर्टात हजर करता येणार नाही. कारण, काश्मीर हा एक परदेशी प्रदेश आहे.

न्यायमूर्ती कयानी यांनी प्रतिवाद केला की, जर पीओके हा परदेशी प्रदेश आहे तर पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी रेंजर्स तेथे  कसे घुसतात ? तसेच लोकांचे अपहरण सुरूच ठेवल्याबद्दल न्यायमूर्ती कयानी यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांवर टीका केली.

कोण आहेत पत्रकार अहमद फरहाद?न्यायालयाच्या युक्तिवादादरम्यान, अहमद फरहाद शाहला धिरकोट पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले.  त्यांच्यावर पीओकेमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. अहमद फरहाद शाह पीओके आणि तेथील लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे व आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत. पाकिस्तानी लष्करावर जोरदार टीका करण्यासाठी ते ओळखले जातात. 

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओके