शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

PoK निवडणूक: इम्रान यांच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा; विरोधक म्हणाले, भारताला बोलवू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 19:46 IST

We will call India in Pok, opponent candidate warning: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावताना तुमच्यापेक्षा भारत चांगला आहे, कमीतकमी ते निवडणूक काळात हिंसाचार तर करत नाहीत, असे म्हटले आहे.  

इस्लामाबाद : पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये (Pakistan occupied kashmir) विधानसभा निवडणुका (Election) होत आहेत. यावेळी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) च्या कार्यकर्त्यांनी जोरदार हिंसा घडविली. यामध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी तुमच्यापेक्षा भारत चांगला, असे म्हणत भारताला बोलविण्याचे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Assembly Election held in Pakistan occupied kashmir today, violence broke out at voting centers. )

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावताना तुमच्यापेक्षा भारत चांगला आहे, कमीतकमी ते निवडणूक काळात हिंसाचार तर करत नाहीत, असे म्हटले आहे.  पीओकेमध्ये 45 विधानसभा जागांसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांची पीटीआय आणि नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) मध्ये कडवी टक्कर होत आहे. सोबत बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) देखील आहे. मात्र, सत्ता आणि प्रशासनाच्या मदतीने इम्रान खान मतदान केंद्रांवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 

नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या उमेदवाराने भारताला बोलविण्याचे वक्तव्य केले आहे. इस्माईल गुज्जर हे  LA 35 मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. त्यांनी म्हटले की, सरकारने हिंसाचारावर रोख लावावी, नाहीतर हालत आणखी वाईट होईल. असे झाले तर येथील लोक मारले जातील. आम्हाला निवडणूक लढण्याचा हक्क नाहीय का, असेच सुरु राहिले तर मी भारताला बोलावेन. तुमच्यापेक्षा ते खूप चांगले, असे ते म्हणाले. 

दरम्यान कोटली जिल्ह्याच्या एका मतदान केंद्रावर पीपीपी कार्यकर्ते आणि पीटीआय कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये पीटीआयचे दोन कार्यकर्ते मारले गेले आहेत. त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे झेलम घाटी जिल्ह्यातील जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी एका मतदान केंद्रावर हल्ला केला, यामध्ये पाच पोलीस जखमी झाले आहेत. यामुळे मतदान केंद्रांवरील मतदान तात्पुरते थांबविण्यात आले होते. विविध ठिकाणच्या राड्यांमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकImran Khanइम्रान खानPOK - pak occupied kashmirपीओके