शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचं थैमान; पण 'या' भागात एकही रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:25 IST

अमेरिकेत कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे; पण तिथलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही.

पॉइंट रॉबर्ट्सजगाच्या पाठीवर असे फार थोडे भूभाग, प्रांत आहेत, जिथे कोरोनानं अद्याप पाय पसरलेले नाहीत. अर्थात असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. कारण अनेक भागात अद्याप कोरोनाच्या चाचण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळेच तिथे कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. जंगलात, सामान्य माणसांपासून दूर राहणाऱ्या जमातींमध्येही कोरोना आढळणार नाही, असं म्हटलं जात होतं. पण, त्यांच्यामध्येही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याचं लक्षात आलं आहे. उलट अशा व्यक्ती कोरोनाच्या लवकर शिकार होतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्या शरीरात अशा विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्तीच तयार झालेली नाही.अमेरिकेत कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे; पण तिथलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही. या बेटाचं नाव आहे ‘पॉइंट रॉबर्ट्स’! या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा भाग अमेरिकेत असला, तर तिथे पोहोचण्याचा मार्ग मात्र कॅनडातून आहे. रस्ते मार्गानं कॅनडातून इथे येता येऊ शकतं. मात्र, कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्याबरोबर कॅनडानं हा मार्गही बंद केला आहे. त्यामुळे अमेरिकेतला हा भूभाग आता संपूर्ण जगासाठी बंद आहे. मात्र, त्याचमुळे कोरोनाच्या संसर्गापासून तो अमेरिकेतला सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. पाच चौरस किमीच्या या बेटावर केवळ १३०० नागरिक राहतात. तेथे जायचं तर दोन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडाव्या लागतात. तिथल्या लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था सध्या कॅनडातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका