शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 08:41 IST

PNG Jewelers in California Robbed: अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सवर २० हून दरोडेखोरांनी बुधवारी दुपारी सिनेस्टाइल दरोडा घालत दागिने लुटून नेले. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

सनीवेल - अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सवर २० हून दरोडेखोरांनी बुधवारी दुपारी सिनेस्टाइल दरोडा घालत दागिने लुटून नेले. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मराठमोळ्या सराफांच्या अमेरिकेतील पेढीवर पडलेल्या या दरोड्याने खळबळ माजली आहे.

पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा टाकल्यावर दरोडेखोरांनी काचेची कपाटे हातोड्याने फोडून त्यातील दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांनी तपास करत दरोडेखोरांच्या कारचा मागोवा काढला. त्यांचा पाठलाग सुरू असताना, दरोडेखोरांनी दागिने रस्त्यावर फेकले.

दीड महिन्यात तीन भारतीय दुकानांवर दरोडेकॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूमवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला होता. अमेरिकेतील भारतीय दागिन्यांच्या दुकानांवर गेल्या दीड महिन्यात तीन दरोडे पडले आहेत. सनीवेल येथील नितीन ज्वेलर्सवर ४ मे रोजी, तर नेवार्क येथील भिंडी ज्वेलर्सवर २९ मे रोजी दरोडा घालण्यात आला. त्यानंतर बुधवारी पीएनजी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली. अशा दुकानांत शिरून तेथील काचेची कपाटे हातोड्याने फोडायची व त्यातील दागिने चोरायचे, अशी समान पद्धत या तीनही गुन्ह्यांत दिसून आली.

नेमक्या किती दागिन्यांची चोरी?- पीएनजी ज्वेलर्सच्या सनीवेल येथील दुकानावर पडलेल्या दरोड्याचा वेगाने तपास करून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.- टोंगा लाटू, तावके एसाफे, ओफा अहोमाना, किलिफी लीएटोआ आणि अफुहिया लावकेयाहो अशी या आरोपींची नावे आहेत. पीएनजी ज्वेलर्सच्या दुकानातून चोरलेल्या दागिन्यांपैकी काही ऐवज या पाच जणांकडून जप्त करण्यात आला आहे.- ३ तसेच अन्य दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. त्यांनी किती रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

टॅग्स :GoldसोनंRobberyचोरीUnited Statesअमेरिका