शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi Sydney: ऑस्ट्रेलियात पीएम मोदींच्या पारंपरिक स्वागताची चर्चा, काय आहे स्मोकिंग सेरेमनी? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 17:18 IST

PM Narendra Modi Sydney: पीएम मोदींनी ऑस्ट्रेलियात 20 हजार भारतीयांना संबोधित केले. यावेळी मोदींचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi in Sydney Australia: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियाने कोणतीही कसर सोडली नाही. पीएम मोदींनी सिडनीच्या कुडोस बँक एरिना येथे 20 हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. 

सिडनीच्या या स्टेडियममध्ये भाषणापूर्वी वैदिक मंत्रोच्चार आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पारंपारिक स्वागताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी 'स्मोकिंग सेरेमनी'ने पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. स्मोकिंग सेरेमनीदरम्यान पीएम मोदी आणि पीएम अल्बानीज यांनी विशेष वनस्पतींच्या पानांच्या धुरामध्ये श्वास घेतला.

स्मोकिंग सेरेमनी म्हणजे काय?ऑस्ट्रेलियातील स्मोकिंग सेरेमनी ही एक पारंपारिक प्रथा आहे, ज्यामध्ये स्थानिक वनस्पतींच्या पानांच्या धूरात श्वास घेतला जातो. या वनौषधींच्या धुराने आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धी होते, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की, स्मोकिंग सेरेमनीमुळे वाईट आत्म्या दूर जातात. पूर्वी बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा दीक्षा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये हे केले जायचे. आता परदेशी पाहुण्यांच्या स्वागतादरम्यानही स्मोकिंग सेरेमनी केली जाते. हा सोहळा आदिवासी समाजातील सदस्य करतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAustraliaआॅस्ट्रेलियाInternationalआंतरराष्ट्रीय