शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 09:56 IST

PM Modi in G7 Summit: जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या मंचावर पंतप्रधान मोदी G7 परिषदेचे 'शो स्टॉपर' बनले.

PM Modi in G7 Summit: जगातील सात श्रीमंत देशांची सर्वात मोठी G7 परिषद इटलीच्या अपुलिया शहरात झाली. पंतप्रधान मोदी इटलीहून भारतात परतले. गेल्या दोन दिवसांत G7 व्यासपीठावर जागतिक स्तरावरील नेतेमंडळींचे विविध कंगोरे पाहायला मिळाले. या सात देशांचा जगाच्या जीडीपीमध्ये ४० टक्के वाटा आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा प्रभाव जगातील नेतेमंडळींवर दिसून आला. जपान, फ्रान्स, इटली, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा हे सात देश G7 आघाडीवर आहेत. भारत या सात देशांमध्ये नाही, तरीही मोदींच्या प्रभावाचा परिणाम म्हणूनच त्यांना केंद्रस्थानी ठेवून एक फोटो काढण्यात आला. त्याचा जागतिक पटलावर खूप मोठा अर्थ निघतो, असे सांगितले जात आहे.

G-7 शिखर परिषदेतील एका फोटोत मोदी मध्य भागी उभे असलेले दिसले. हा फोटो जागतिक मुत्सद्देगिरीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या चित्राच्या मध्यभागी पंतप्रधान मोदी आहेत. डावीकडे जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ आणि उजवीकडे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, तर खालच्या रांगेत एका बाजूला मेलोनी आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन धर्मगुरू पोप उभे आहेत. या फोटोत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन केंद्रापासून दूर आहेत. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने पाहिल्यास, भविष्यातील योजनेच्या केंद्रस्थानी भारत असणार आहे, असा संकेत दिला जात आहे.

दरम्यान, इटलीतील अपुलिया येथे पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांमध्ये केंद्रस्थानी दिसले. भारत आणि इटली यांच्यातील राजकीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही बाब आनंददायी वाटली. मोदींच्या गाठीभेटी बरंच काही दाखवून देत होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी मोदी भेटले. मंचावर पंतप्रधान मोदींनी पोप यांची गळाभेट घेतली. मॅक्रॉन आणि सुनक या दोन मोठ्या युरोपीय देशांचे नेते मोदींसोबत राजकीय चर्चा करताना दिसले. इतकेच नव्हे तर मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली, ज्याचे राजकीय पटलावर खूप महत्त्वाचे संकेत आहेत. याशिवाय, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी मोदींनी घेतलेली भेट देखील भारत-कॅनडा यांच्यातील सलोखा नव्याने प्रस्थापित करण्यावर भर देतानाच दिसत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीItalyइटलीCanadaकॅनडाAmericaअमेरिका