शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अरबी भाषेत रामायण आणि महाभारत भाषांतर करणारे अब्दुल्ला बॅरन आणि अब्दुल लतीफ कोण आहेत? कुवेतमध्ये नरेंद्र मोदींची घेतली भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:15 IST

अब्दुल्ला अल बॅरन यांनी रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्याचे अरबी भाषेत भाषांतर करून जागतिक साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचे प्रकाशन कुवेतचे प्रमुख प्रकाशक अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी केले आहे. 

कुवेत सिटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले आहेत. ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८१ मध्ये कुवेतला गेल्या होत्या. विमानतळावर नरेंद्र मोदींचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात नरेंद्र मोदींची कुवेतमध्ये अब्दुल्ला अल बॅरन आणि अब्दुल लतीफ अलानसेफ यांच्याशी खास भेट झाली. अब्दुल्ला अल बॅरन यांनी रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्याचे अरबी भाषेत भाषांतर करून जागतिक साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचे प्रकाशन कुवेतचे प्रमुख प्रकाशक अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवेतमध्ये या दोन्ही व्यक्तींची भेट घेतली. अब्दुल्ला अल बॅरन आणि अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अरबी भाषेत अनुवादित रामायण आणि महाभारताच्या प्रतीही दिल्या. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी भाषेत अनुवादित केलेल्या या दोन्ही महाकाव्यांवर आपली स्वाक्षरी केली होती.

अब्दुल लतीफ अलनेसेफ म्हणाले, "या पुस्तकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खूश आहेत. ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. अरबी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील. या पुस्तकाचा मला सन्मान आहे. या पुस्तकाच्या अनुवादाला जवळपास २ वर्षे लागली आहेत."

कोण आहेत अब्दुल्ला अल बॅरन  आणि अब्दुल लतीफ अलनेसेफ?कुवेतचे प्रसिद्ध साहित्यिक असण्यासोबतच अब्दुल्ला अल बॅरन हे एक उत्कृष्ट अनुवादक देखील आहेत. रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्यांचे अरबीमध्ये भाषांतर करताना त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास आणि परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा अनुवाद हा एक अनोखा अनुभव म्हणून वाचकांनी स्वीकारला. हे यश अरबी भाषिक समाजाला भारतीय महाकाव्यांचे सखोल आणि समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. साहित्य आणि अनुवादाच्या क्षेत्रात बॅरनचे योगदान कौतुकास्पद आहे. तर अब्दुल लतीफ अलनेसेफ हे कुवेतचे प्रसिद्ध प्रकाशक आहेत.

३० हून अधिक पुस्तकांचे भाषांतरअब्दुल्ला अल बॅरन यांनी आतापर्यंत ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय महाकाव्यांचे आणि पुस्तकांचे भाषांतर केले आहे, जे अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी प्रकाशित केले आहे. त्यात रामायण आणि महाभारताचाही समावेश आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा एक अद्भुत प्रयत्न आहे. दरम्यान, ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांच्या कुवेत दौऱ्यात या महाकाव्याचे अरबी भाषेत भाषांतर आणि प्रकाशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा एक भाग मानला जात आहे. या प्रयत्नांमुळे भारत आणि अरब देशांमधील साहित्यिक आणि सांस्कृतिक संबंधांना नवी उंची मिळाली आहे.

भारत, कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंधभारत आणि कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंध आहेत, सागरी व्यापार त्यांच्या ऐतिहासिक संबंधांचा कणा आहे. कुवेतला भारतीय निर्यात आता २ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि भारतातील कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कुवेत हा भारताचा एक महत्त्वाचा ऊर्जा भागीदार आहे, जो भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजांपैकी ३% गरजा पूर्ण करतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय