शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी UAE ला रवाना, राष्ट्रपती शेख बिन झायेद यांची घेणार भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 09:17 IST

PM Modi UAE Visit : दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

पॅरिस : फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीला (UAE) रवाना झाले. दरम्यान, नरेंद्र मोदींनी आपला फ्रान्स दौरा 'संस्मरणीय' असल्याचे सांगितले. तसेच, फ्रान्सच्या बॅस्टिल डे सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे तो अधिक खास झाला, असे म्हणत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि येथील लोकांचे नरेंद्र मोदींनी आभार मानले.

दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी 14 जुलै रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतच्या संवादक परिषदेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील विविध करारांवर चर्चा झाली.

याचबरोबर, नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यावसायिक सहकार्यामध्ये विविधता आणण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी विविध कंपन्यांच्या सीईओंची देखील भेट घेतली. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नरेंद्र मोदी म्हणाले, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी खूप फलदायी चर्चा झाली. आम्ही संपूर्ण भारत-फ्रान्सच्या संपूर्ण संबंधांचा आढावा घेतला. ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, एआय, सेमीकंडक्टर आणि इतर यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबद्दल मी विशेषतः उत्साहित आहे." 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE) साठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भारत आणि संयुक्त अरब अमिराती फिनटेक, संरक्षण, सुरक्षा आणि ऊर्जा यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच,  संयुक्त अरब अमिराती या वर्षाच्या अखेरीस UNFCCC (COP-28) ची 28 वी परिषद आयोजित करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीFranceफ्रान्स