शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या- जनकपूर बससेवा सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 12:32 IST

धार्मिक पर्यटनासाठी रामायण सर्किट अंतर्गत अयोध्या, नंदिग्राम, शृंगवरपूर आणि चित्रकूटचा विकास केला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे.

जनकपूर- भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये एकत्रित रामायण सर्किट तयार करु आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जनकपूर येथे बोलताना दिले. पंतप्रधानांनी नेपाळमधील जनकपूर ते भारतातील अयोध्या यांना जोडणाऱ्या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून  दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.15 वाजल्यापासून त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा प्रारंभ झाला. या दौऱ्यात सर्वात प्रथम ते जनकपूर येथे गेले असून जानकी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहाण्यासाठी जनकपूरवासियांनी मोठी गर्दी केली होती.

 

दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथए नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतीलय या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.

के. पी. शर्मा ओली गेल्याच महिन्यात भारतात आले होते. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. नेबरहूड फर्स्ट या भारत सरकारच्या धोरणाला अनुसरूनच हा आपला दौरा होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आज नेपाळ लोकशाहीच्या मदतीने आणि वेगवान आर्थिक प्रगतीच्या साहाय्याने नव्या युगात प्रवेश करत आहे. नेपाळ सरकारच्या समृद्ध नेपाळ आणि सुखी नेपाळ या धोरणाला सहाय्य करण्यासाठी भारत बांधील आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.धार्मिक पर्यटनासाठी रामायण सर्किट अंतर्गत अयोध्या, नंदिग्राम, शृंगवरपूर आणि चित्रकूटचा विकास केला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे.

टॅग्स :NepalनेपाळNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याJanakpurजनकपूरKathmanduकाठमांडू