PM Narendra Modi France : पंतप्रधान नरेंद्र मोदीफ्रान्सच्या दौऱ्यावर गेले असून, तिथे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पीएम मोदींचे स्वागत केले. दोघेही फ्रान्समध्ये आयोजित एआय ॲक्शन समिटचे सह-अध्यक्ष आहेत. दरम्यान, मोदी आणि मॅक्रॉन द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी फ्रान्समधील माझारग्युस वॉर सेमेटरीलाही (Mazargues War Cemetery) भेट देणार आहेत. ही माझारग्युस वॉर सेमेटरी काय आहे, पीएम मोदी तिथे का जात आहेत, काय आहे या जागेचा इतिहास ? जाणून घ्या...
भारतीय सैनिकांचे स्मारकही जागा पहिल्या महायुद्धाशी संबंधित आहे. पहिले महायुद्ध जुलै 1914 मध्ये झाले होते. त्यावेळी जर्मनीसमोर ब्रिटन आणि फ्रान्सचे आव्हान होते. जर्मनीने बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर हल्ला केला होता. जर्मन फौजा फ्रान्सच्या दिशेने जाऊ लागल्यावर ब्रिटननेही जर्मनीविरुद्धच्या युद्धात उडी घेतली. पश्चिम आघाडीवर ब्रिटन आणि फ्रान्स संयुक्तपणे जर्मनीशी सामना करत होते. त्या युद्धात भारतीय सैनिक फ्रेंच-ब्रिटिश सैन्यात दाखल झाले होते.
हजारो भारतीय सैनिक शहीद या लढाईत ब्रिटीश बाजूचे भारतीय सैनिकही सामील होते, ज्यांना काही दिवसांपूर्वीच बॉम्बे (आताची मुंबई) येथून युरोपला नेण्यात आले होते. यापैकी तत्कालीन मेरठ विभागाच्या गढवाल ब्रिगेडने सुरुवातीलाच हल्ल्याचे नेतृत्व केले होते. गढवाल ब्रिगेडच्या सैनिकांनी त्वरीत जबाबदारी स्वीकारली. या काळात संपूर्ण फ्रान्समध्ये जर्मन सैनिकांशी लढताना सुमारे चार हजार भारतीय सैनिक शहीद झाले. यामध्ये भारतीय कामगारांचाही समावेश होता. या शहीद सैनिकांपैकी मोठ्या संख्येने न्यूव्ह चॅपेलमध्ये दफन करण्यात आले. या शहीद भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ 1927 मध्ये न्यूव्ह चॅपेल येथे युद्ध स्मारक बांधण्यात आले.
सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारकयाशिवाय मार्सेलिस शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी या सैनिकांचे दफन करण्यात आले. यापैकी 205 भारतीय सैनिकांना तात्पुरते सेंट पियरे स्मशानभूमीत दफन करण्यात आले. युद्ध संपल्यानंतर मार्सेलिसमधील शहीद सैनिकांचे मृतदेह आणि राख वेगवेगळ्या स्मशानभूमीतून बाहेर काढण्यात आले आणि माझारग्यूज स्मशानभूमीत पुरण्यात आले. या स्मशानभूमीच्या मागे 205 भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारकही बांधण्यात आले आहे, ज्याला मजारग्युस वॉर सेमेटरी म्हणून ओळखले जाते. फील्ड मार्शल सर विल्यम बर्डवुड यांनी 1925 साली याचे उद्घाटन केले होते.
अंत्यसंस्कारासाठी विशेष व्यवस्था केलीपहिल्या महायुद्धात फ्रेंच कायद्यानुसार अंत्यसंस्कार बेकायदेशीर होते. अशा परिस्थितीत युद्धात शहीद झालेल्या हिंदू आणि शीख सैनिकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती आणि बंदराच्या काठावर एक घाटही बांधण्यात आला होता, जिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील. दुस-या महायुद्धात शहीद झालेल्या 267 सैनिकांचे दफन माझारग्युस वॉर सेमेटरीमध्ये करण्यात आले आहे.