शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 19:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी (दि. 8) पीएम मोदींचे विमान रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले. तर, आज पंतप्रधान मोदींचा रशियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' हा पुरस्कार दिला. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी(दि9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' देऊन सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी पुतिन यांचे आभार मानले. तसेच, हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान असून, भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे हे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, परस्पर सहकार्य आणि शांतता प्रस्थापित करण्यावर चर्चा केली.

यावेळी मोदी पुढे म्हणाले की, भारत-रशिया भागीदारी महत्त्वाची आहे. आमचा विश्वास आहे की, शांतता आणि स्थिरतेसाठी प्रयत्न सुरूच राहिले पाहिजेत. या दिशेने आम्ही सातत्याने काम करू. सर्वच क्षेत्रात संबंध दृढ करावे लागतील. आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा फायदा दोन्ही देशांनाच नाही, तर संपूर्ण जगाला होईल. पुतीन यांना उद्देशून मोदी म्हणाले की, तुम्ही दोन्ही देशांदरम्यान जो धोरणात्मक संबंधांचा पाया घातला, तो काळाच्या ओघात मजबूत होत गेला आहे. 

पुतिन यांनी केले अभिनंदनयावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की प्रिय मित्र, या सर्वोच्च पुरस्काराबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला चांगले आरोग्य आणि यश मिळो, ही शुभेच्छा. मी भारतातील लोकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.

पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत यशस्वी : सर्गेई लावरोवरशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, पीएम मोदींचा हा दौरा यशस्वी झाला. पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी द्विपक्षीय अजेंडाच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, G-20, BRICS, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्समधील आमचे सहकार्य, यावर चर्चा झाली. मला खात्री आहे की, या दौऱ्यामुळे सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनInternationalआंतरराष्ट्रीय