शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदी- महाथिर महंमद यांची भेट, मलेशियानंतर सिंगापूरला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 12:10 IST

क्वालालंपूर येथे उतरल्यावर पुत्रजया येथे पेर्देना पुत्र कॉम्प्लेक्स येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाथिर महंमद यांची भेट घेतली

क्वालालंपूर- तीन देशांच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काही वेळासाठी मलेशियाला भेट दिली. मलेशियात नुकतेच निवडून आलेले पंतप्रधान महाथिर महंमद यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा ही केली. महाथिर महंमद हे जगातील सर्वात वयोवृद्ध निर्वाचित पंतप्रधान आहेत. क्वालालंपूर येथे उतरल्यावर पुत्रजया येथे पेर्देना पुत्र कॉम्प्लेक्स येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाथिर महंमद यांची भेट घेतली. महाथिर यांचे अभिनंदन केल्यानंतर उपपंतप्रधान वॅन अझिझा यांची भेट त्यांनी घेतली. मलेशियामध्ये आपले स्वागत केल्याबद्दल महाथिर यांचे आभार मानणारे ट्वीटही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर ते सिंगापूरसाठी रवाना झाले.

सिंगापूरमध्ये अर्थ, कौशल्यविकास, नगरनियोजन, कृत्रिम बुद्धीमत्ता अशा अनेक विषयांवर त्यांची चर्चा होईल आणि ते काही निवडक उद्योगांच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतील. शुक्रवारी ते राष्ट्रपती हालिमा याकोब यांची भेट घेतील व पंतप्रधान ली सिन लूंग यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा करतील. या भेटीनंतर ते नानयांग तंत्रज्ञान विद्यापिठाला भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी शांग्री ला संवाद परिषदेत सहभागी होतील. 1 जून रोजी क्लीफर्ड पियर येथे एका कोनशिलेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. येथे महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन झाले होते.

इंडोनेशियन नागरिकांना 30 दिवसांचा फ्री व्हीसापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली. इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रणही त्यांनी दिले.तत्पूर्वी, इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला व इंडोनेशियाने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या लढाईत भारत त्याच्यामागे ठामपणे राहील, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMalaysiaमलेशियाsingaporeसिंगापूरIndonesiaइंडोनेशिया