शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 06:59 IST

पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेसाठी केलेल्या कामांचा गौरव

न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना गौरवण्यात आलं. स्वच्छतेसाठी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना यासाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीनं मोदींना ग्लोबल गोलकीपर पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं गौरवण्यात आल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. हा माझा एकट्याचा सन्मान नसून कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले. कोट्यवधी भारतीयांनी स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. महात्मा गांधींनी स्वच्छतेचं स्वप्न पाहिलं होतं. ते आता पूर्ण होत आहे. एखादं गाव स्वच्छ होईल, तेव्हाच त्या गावाला आदर्श म्हणता येईल, असं महात्मा गांधी म्हणाले होते. मात्र आता आम्ही एक गाव नव्हे, तर संपूर्ण देशच स्वच्छ करण्याकडे वाटचाल करत आहोत, असं मोदींनी म्हटलं. गेल्या पाच वर्षात स्वच्छतेसाठी अनेक पावलं उचलण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. पाच वर्षांमध्ये ११ कोटी शौचालयं बांधण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. अनेकांच्या प्रतिष्ठेचं त्यामुळे रक्षण झालं, असं मोदींनी म्हटलं. भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेतही पाच वर्षात सुधारणा झाली. यामध्येही स्वच्छ भारत योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं मोदी म्हणाले. स्वच्छतेमुळे लहान मुलांमधील हृदयाशी संबंधित समस्यांचं प्रमाण कमी झाल्याचंदेखील पंतप्रधानांनी म्हटलं. यावेळी त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या अहवालाचा संदर्भ दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBill Gatesबिल गेटस