शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी ब्रुनेईत दाखल, क्राऊन प्रिन्स हाजी अल-मुहतादी यांनी केलं जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:41 IST

महत्वाचे म्हणजे, दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे.

पंतप्रधाननरेंद्र मोदी सोमवारी ब्रुनेई येथे पोहोचले. विमानतळावर क्राउन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत विशेष मानला जात आहे. कारण भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलीच द्विपक्षीय दौरा आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे.

अनिवासी भारतीयांकडूनही स्वागत -पंतप्रधान मोदी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथे पोहोचले. येथे ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. तेथे अनिवासी भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी हॉटेलबाहेर उपस्थित लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या.

पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते म्हणाले, "ब्रुनेई आणि सिंगापूर हे भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणात आणि इंडो-पॅसिफिकच्या दृष्टीकोनात महत्त्वाचे भागीदार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे केवळ दोन देशांसोबतच नव्हे, तर मोठ्या आसियान क्षेत्रासोबतची भारताची भागीदारी आणखी मजबूत होईल."

या मुद्द्यांवर होणार चर्चा? - परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पंतप्रधान मोदींच्या ब्रुनेई दौऱ्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यातील अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामुळेच त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

सेमीकंडक्टर सहकार्य - पंतप्रधान मोदी तेथील सुल्तानांसोबत बोलताना सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या  शक्यतेवर चर्चा करतील.

द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक - भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात 270 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. द्विपक्षीय चर्चेत, पंतप्रधान नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीसंदर्भात तेथील सुलतानांसोबत चर्चा करतील.

हायड्रोकार्बन आणि नैसर्गिक वायूची आयात -भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करतो. सध्या भारत नैसर्गिक वायूची आयात वाढविण्यावर भर देत आहे. अशात पंतप्रधान मोदी या विषयावरही विशेष चर्चा करू शकतात, असे मानले जात आहे.

म्यानमारच्या परिस्थितीवर चर्चा - पीएम मोदी सुल्तान हसनल बोल्किया यांच्यासोबत म्यानमारच्या स्थितीवरही चर्चा करू शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानsingaporeसिंगापूर