शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:11 IST

नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Nepal Plane Crash :नेपाळमध्ये पुन्हा एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्यातरी समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मित्सुबिशी CRJ-200ER या दुर्दैवी सौर्य एअरलाइन्सच्या फ्लाइट 9N-ME मध्ये हा अपघात झाला.

काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. विमान कोसळताच त्याने पेट घेतला. हा अपघात सकाळी ११ च्या सुमारास झाला. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अपघाताचे कारण आणि जीवितहानी अद्याप समजू शकलेली नाही. अपघातस्थळावरून आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानाचा पायलट कॅप्टन मनीष शाक्य (३७) याला वाचवण्यात आले असून त्यांना सिनामंगल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला. अपघातानंतर लगेचच विमानाला आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचारी आग विझवण्यासाठी आणि वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

टॅग्स :NepalनेपाळAccidentअपघातAirportविमानतळ