शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातही पेट्रोलचे दर पेटणार; 'ओग्रा'च्या सल्लानं इम्रान खान सरकार गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:52 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनाचे दर पाहता तेल आणि वायू नियामक प्राधिकरणानं खान सरकारला पेट्रोलच्या दरात १६ रुपयांचा वाढ करण्याची शिफारस केली आहे

इस्लामाबाद: गेल्या काही दिवसांपासून भारतात पेट्रोल, डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. पुढील काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरी पार करतील. डिझेलच्या दरातही वाढ होत असल्यानं वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची चिन्हं आहेत. शेजारच्या पाकिस्तानातही भारतासारखीच परिस्थिती आहे. महागाईचा दुहेरी फटका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढपाकिस्तानात पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. मात्र आता हे दर लवकरच सव्वाशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तेल आणि वायू नियामक प्राधिकरणानं (ओग्रा) इम्रान खान सरकारला पेट्रोलच्या दरात लिटरमागे १६ रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानात पेट्रोलचा दर १११.९० रुपये आहे. यामध्ये आणखी १६ रुपयांची भर पडल्यास पेट्रोलचा दर १३० पाकिस्तानी रुपयांच्या जवळ जाईल. पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारणजागतिक बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारनं इंधनाच्या दरांत वाढ करावी असा सल्ला ओग्रानं इम्रान खान यांना दिला आहे. सरकारनं पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ न केल्यास इंधन कंपन्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागेल, अशा धोक्याचा इशारा ओग्रानं दिला आहे. त्यामुळे आता खान सरकारला इंधन दरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल.ओग्रानं इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शिफारस करूनही पेट्रोल, डिझेलच्या नाममात्र वाढ केल्याचं काही दिवसांपूर्वी खान सरकारनं म्हटलं होतं. मात्र आता ओग्रानं पुन्हा इंधनाचे दर वाढवण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे आता खान सरकारवर मोठा दबाव आहे. १६ फेब्रुवारीपासून पाकिस्तानात इंधनाचे दर वाढतील. पण ही वाढ ३ रुपयांपर्यंत असेल, अशी माहिती पाकिस्तान सरकारमधील अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलPakistanपाकिस्तान