शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:59 IST

36 देशांतील जवळपास 80,000 प्रौढांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणतून समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक आता कुठलाही धर्म मानत नाहीत, जे कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत, अशा लोकांची संख्या वाढत आहे...

जगभरातील अनेक देशांतील लोक झपाट्याने आपला धर्म सोडताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, प्रौढांपैकी प्रत्येक पाचवी व्यक्ती अथवा याहूनही अधिक लोक ते जन्माला आलेला धर्म सोडताना दिसत आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, या 'धार्मिक परिवर्तनाचा' सर्वाधिक फटका ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माला बसत आहे. 

36 देशांतील जवळपास 80,000 प्रौढांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणतून समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक आता कुठलाही धर्म मानत नाहीत, जे कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत, अशा लोकांची संख्या वाढत आहे.

जगभरातील देशांचा विचार करता धार्मिक परिवर्तनाच्या दरात मोठा फरक दिसतो. काही देशांत धर्म बदलणे, ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. भारत, इस्रायल, नायजेरिया आणि थायलंडमध्ये, ९५% अथवा त्याहूनही अधिक वयस्क लोक म्हणतात की, आपण अद्यापही ज्या धर्मात जन्माला आलो आणि वाढलो त्याचाच भाग आहोत. 

मात्र, पूर्वी आशिया, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आपला धर्म सोडणे सामान्य गोष्ट झाली आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, दक्षिण कोरियातील 50%, नेदरलँडमधील 36%, अमेरिकेतील 28% आणि ब्राझिलमधील 21% प्रौढ, आता स्वतःकडे, ते जन्माला आलेल्या धर्माशी जोडून बघत नाहीत.

कोणता धर्म स्वीकारतायत लोक? -आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अधिकांश लोक सांगतात की ते नास्तिक आहेत. अज्ञेयवादी अर्थात अशी व्यक्ती, जी ईश्वराच्या अस्तित्वासंदर्भात अथवा स्वरूपासंदर्भात काहीही माहीत नाही अथवा जाणले जाऊ शकते, असे मानते. यातील बहुतांश लोक ख्रिश्चन धर्मात वाढलेले आहेत. उदाहरणार्थ, स्वीडनमधील २९% प्रौढ म्हणतात की ते ख्रिश्चन धर्मात वाढले आहेत. मात्र ते आता स्वतःला धार्मिकदृष्ट्या नास्तिक अथवा अज्ञेयवादी म्हणवतात.

बौद्ध धर्माचे अनुयायीही सोडतायत धर्म -काही देशांमध्ये, बौद्ध धर्माचे अनुयायीदेखील धर्मापासून दूर जात आहेत. उदाहरणार्थ, जपानमध्ये सर्वेक्षण केलेल्यांपैकी २३%, तर दक्षिण कोरियात १३ टक्के लोक सांगत आहेत की, ते पूर्वी बौद्ध होते, मात्र आता कोणत्याही धर्मात नाही.

नास्तिक कुटुंबात जन्मलेले होतायत धार्मिक - याशिवाय, नास्तिक लोकही धार्मिक होताना दिसत आहेत. सर्वेक्षणानुसार, आपले पालन-पोषण कुठल्याही धर्माने झाले नाही. मात्र आज आपला धर्म आहे (9%). असे म्हणणारे लोक दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक आहे. यांपैकी, 6% लोक आपण ख्रिश्चन असल्याचे सांगत आहे. 

याशिवाय, सिंगापूर (13%), दक्षिण आफ्रिका (12%) आणि दक्षिण कोरिया (11%) पैकी जवळपास दहा पैकी एक अथवा त्याहून अधिक लोकांनी दोन धर्मांत स्विच केले आहे.

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेAmericaअमेरिकाIndiaभारतIsraelइस्रायलBrazilब्राझीलHinduहिंदूMuslimमुस्लीम