शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आयुष्य 'बर्बाद' करतायत 9-5 जॉब करणारे लोक, वयाच्या 23व्या वर्षीच कोडपती बनलेल्या तरुणानं सांगितली ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 08:54 IST

कॅम आता दरमहिन्याला 2 कोटींहून अधिकची कमाई करत आहे...

आपली हिंमत आणि मेहनतीच्या जोरावर वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षीच कोट्यधीश बनलेल्या एका तरुणाने, जे लोक 9 ते 5 नोकऱ्या करत आहेत, ते आपले आयुष्य वाया घालवत आहेत, असा दावा केला आहे. कॅम मोअर असे या तरुणाचे नाव आहे. त्याने नोकरी सोडली आणि तो आता इतरांनाही नोकरी नोकरी सोडण्याचा सल्ला देत आहे. कॅम अत्यंत उत्कृष्ट जीवन जगत आहे. त्याने ई-कॉमर्स व्यवसाय सुरू केला असून तो वेगाने वाढत आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, कॅम दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. तो जीवनाचा भरपूर आनंद घेत आहे. असे जीवन कुणीही मिळवू शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. कॅमने कारपेंटरचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, मात्र प्रशिक्षण संपण्याच्या सहा महिने आधीच त्याने हे काम सोडले. तसेच, थोड्या पैशांसाठी आठवड्यातील पाच दिवस 12-12 तास, काम करून आपण त्रस्त झालो होतो, असेही तो सांगतो.

बिझनेसमधून कोट्यवधी कमावतो कॅम - कॅमने 2020 मध्ये आपले करिअर सोडले आणि तो ई-कॉमर्स उद्योगात उतरला. या उद्योगात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. खरे तर असे करून त्याने मोठा धोकाच पत्करला होता. मात्र, तो आता दरमहिन्याला 2 कोटींहून अधिकची कमाई करत आहे. डेली मेल सोबत बोलताना त्याने सांगितले की, जेव्हा पैसे येऊ लागले तेव्हा मी अवाक झालो. तो म्हणाला, 'खरोखरच यात धोका होता. कारण मी स्वतःच्या बळावर सर्वकाही केले आहे आणि मला वाटते की, याच गोष्टीची लोकांना सर्वाधिक भीती वाटते. तसेच, असे लोक कसलाही विचार न करता, आपले आयुष्य बर्बात करत आहेत', असे मला वाटते, असेही त्याने म्हटले आहे.

कॅम म्हणाला, 'लोकांना सांगितले जाते की, आपल्याला आयुष्यात केवळ शाळेत जायचे आहे, मग पदवी घ्यायची आहे अथवा व्यवसाय करायचा आहे, घर घ्यायचे आहे आणि आयुष्यभर त्याचे पैसे चुकवायचे आहे. मीही काही काळ याच मानसिकतेत होतो. मात्र आपण स्वतःसाठी काम करून किती पैसे कमावू शकतो याची जाणीव मला झाली आणि मग मी मागे वळून पाहिले नाही.' आता कॅम आली कंपनी सिक्स फिगर ड्रॉप शिपरद्वारे ई-कॉमर्स उद्योगाविषयी लोकांना माहिती देत आहे. 2020 मध्ये त्याचा ब्रँड लॉन्च झाला, तेव्हापासून त्याने 2500 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे.

कोट्यधीश झाल्यानंतर, कॅम 6.46 कोटी रुपयांच्या घरात राहतो. त्याने BMW M5 कारही घेतली आहे. याशिवाय तो आयुष्याचा आनंदही घेत आहे. तो म्हणाला की, कारपेंटर कामात त्याला आनंद मिळत होता. मात्र थोड्या दिवसांतच ही नोकरीही आपल्याला कुचकामी वाटू लागली. 'आता प्रत्येक दिवस खरोखरच वेगळा आहे आणि मी माझ्या नशिबाचा मास्टर आहे,' असेही तो सांगतो.

टॅग्स :businessव्यवसायEmployeeकर्मचारीjobनोकरी