वॉशिंग्टन : पाकिस्तानातील दहशतवाद्यांची सुरक्षित स्थाने नष्ट होत नाहीत तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता हे स्वप्नच राहील, असे स्पष्ट मत मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएन) नेते अल्ताफ हुसेन यांनी गुरुवारी म्हटले. बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात काय हवे ते करण्याचे स्वातंत्र्य आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. हिंसाचार करणारे हे लोक मानवतेचे शत्रू असून अफगाणिस्तानातील शांततेला त्यांच्याकडून उघड धोका आहे. जोपर्यंत पाकिस्तानात दहशतवादाला संरक्षण आहे तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता ही स्वप्नच राहील ते म्हणाले. अल्ताफ हुसेन हे लंडनमध्ये वास्तव्यास असून एमक्यूएमच्या अमेरिकन शाखेने हे निवेदन प्रसिद्धीस दिले.(वृत्तसंस्था)
‘पाकमध्ये दहशतवाद सुरक्षित असेपर्यंत शांतता हे स्वप्नच’
By admin | Updated: June 2, 2017 00:37 IST