शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 10:48 IST

जानेवारीत दाओसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही लगार्ड यांनी भारतातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता.

नवी दिल्ली: उन्नव आणि कथुआ बलात्कार प्रकरणांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांचे पडसाद उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनीही भारतातील महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केलं आहे. महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या, असा सल्ला क्रिस्तिना लगार्ड यांनी मोदींना दिला आहे. मोदींनी महिलांच्या सुरक्षेकडे अधिकाधिक लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. 'भारतात जे काही घडलं, ते अतिशय किळसवाणं होतं. याप्रकरणाची भारतातील प्रशासकीय यंत्रणा गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींकडून याची सुरुवात होईल, अशी आशा आहे. भारतातील महिलांच्या सुरक्षेसाठी हे अतिशय आवश्यक आहे,' असं क्रिस्तिना लगार्ड यांनी म्हटलं. महिलांची स्थिती सुधारा, असा सल्ला लगार्ड यांनी गेल्या चार महिन्यात दोनवेळा मोदींना दिला आहे.याआधी जानेवारीत दाओसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही लगार्ड यांनी भारतातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मोदी यांनी या परिषदेत भाषण केलं होतं. या भाषणात महिलांचा फारसा उल्लेख नसल्याचं लगार्ड यांनी म्हटलं होतं. 'मोदींनी दाओसमध्ये भाषण केलं होतं. त्यांच्या या भाषणात भारतातील महिलांचा फारसा उल्लेख नव्हता, हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं,' असं लगार्ड यांनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण