शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

युक्रेनमध्ये हिरो बनला 'Patron'; अशाप्रकारे वाचविले शेकडो लोकांचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:11 IST

Patron - A Ukrainian service dog : पॅट्रोन हा युक्रेनियन शहर चेर्निहाइव्हजवळ स्फोटक उपकरणे शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी जबाबदार असलेल्या टीमसोबत काम करणारा सर्व्हिस डॉग आहे, असे सोमवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान एक कुत्रा (Service Dog) हिरो बनला आहे. या कुत्र्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही एक निवेदन जारी करून या कुत्र्याचे कौतुक केले आहे आणि शेकडो जीव वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. दरम्यान, पॅट्रोन (Patron) नावाचा हा कुत्रा युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेशी संबंधित आहे.

WION मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा आहे की, पॅट्रोनने आतापर्यंत रशियन सैनिकांनी पेरलेली 150 हून अधिक स्फोटक उपकरणे (Explosive Devices) शोधली आहेत, ज्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आहेत. जर पॅट्रोनने हे केले नसते तर युक्रेनचे मोठे नुकसान झाले असते, असे सांगण्यात आले आहे.

पॅट्रोन हा युक्रेनियन शहर चेर्निहाइव्हजवळ स्फोटक उपकरणे शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी जबाबदार असलेल्या टीमसोबत काम करणारा सर्व्हिस डॉग आहे, असे सोमवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, रशियन हल्ले सुरू झाल्यापासून पॅट्रोनने 150 हून अधिक स्फोटक उपकरणे शोधून काढली आहेत. युक्रेन शहर सुरक्षित केल्याबद्दल आम्ही पॅट्रोनचे आभार मानतो.

सोशल मीडियावर व्हायरल होतायेत Video @patron_dsns या इन्स्टाग्राम हँडलवर सोशल मीडियावर पॅट्रोनचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, जे व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये तो कर्तव्य बजावताना दिसत आहे. पॅट्रोन हा दोन वर्षांचा असून तो जॅक रसेल टेरियर (Jack Russell Terrier) जातीचा कुत्रा आहे. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेच्या (SES) चेर्निहाइव्ह शाखेचा हा मेंबर युक्रेनमध्ये तसेच जगभरात प्रसिद्ध झाला आहे.

पॅट्रोनवर चित्रपट बनणारयाआधी सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीनेही ड्युटीवर असलेल्या पॅट्रोनचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याच्या कथेवर एक दिवस चित्रपट बनवला जाईल, असे सांगितले आहे. "एक दिवस पॅट्रोनची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाईल, परंतु सध्या तो आपली व्यावसायिक कर्तव्ये निष्ठेने पार पाडत आहे," असे ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :dogकुत्राRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया