शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Plane Crashes in Nepal नेपाळमध्ये खराब हवामानामुळे प्रवासी विमान काेसळले; प्रवाशांमध्ये ठाण्यातील चौघांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 10:48 IST

Passenger plane crashes in Nepal due to bad weather; Passengers include four from Thane : विमानाने पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर पंधरा मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

Plane Crashes in Nepal काठमांडू  : नेपाळमध्ये पोखरा येथून जोमसोमला जाणारे तारा एअर या कंपनीचे लहान आकाराचे एक प्रवासी विमान रविवारी कोसळले. या विमानात ठाण्यातील चार जणांसह २२ जण होते. लामचे नदीच्या किनारी कोवांग गावानजिक विमानाचे अवशेष आढळल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. जिथे विमान कोसळले तिथे पोहोचण्यास खराब हवामानामुळे अनेक अडथळे येत आहेत.

विमानाने पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर पंधरा मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान जिथे कोसळले तिथे लष्करी जवान  तत्काळ रवाना झाले. विमानात ठाण्याच्या चार प्रवाशांसोबत जर्मनीचे दोन व नेपाळचे १३ प्रवासी होते. त्यापैकी अशोककुमार त्रिपाठी, रितिका त्रिपाठी, वैभवी त्रिपाठी, धनुष त्रिपाठी हे एकाच कुटुंबातील चारजण ठाण्याच्या कापुरबावडी भागातील रहिवासी आहेत.

वैमानिकाच्या मोबाइलचा जीपीएसद्वारे घेतला वेध

तारा एअर कंपनीच्या कोसळलेल्या विमानामध्ये वैमानिक कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल व किस्मी थापा ही हवाईसुंदरी असा कर्मचारी वर्ग होता. विमानाचा पायलट घिमिरेचा मोबाइल सुरू होता. त्यावरून जीपीएसच्या सहाय्याने हे विमान कुठे कोसळले असावे, याचा नेपाळच्या लष्कराला अंदाज आला. 

टॅग्स :airplaneविमानNepalनेपाळthaneठाणे