शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीमुळे त्रास व्हायला लागल्याने तरूणीला विमानातून उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 14:35 IST

ब्रिटनच्या एका तरूणीला मासिक पाळीतील होणाऱ्या त्रासामुळे जबरदस्ती विमानातून उतरविण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

लंडन- ब्रिटनच्या एका तरूणीला मासिक पाळीतील होणाऱ्या त्रासामुळे जबरदस्ती विमानातून उतरविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावेळी या तरूणीचा बॉयफ्रेण्डही उपस्थित होता. महिला व तिचा प्रियकर दुबईला जात होते त्यावेळी ही घटना घडली. विमानाच्या उड्डाणाआधी तरूणीला त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. टाइम्स ऑफ लंडनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बेथ इव्हेंस (वय 24)  ही तिचा बॉयफ्रेण्ड जोशुआ मोरानबरोबर (वय 26) 17 फेब्रुवारी रोजी दुपारी इंग्लंडच्या बर्मिघम एअरपोर्टवरून दुबईला जाणार होती. पण विमानात बसल्यावर बेथला पाळीमुळे  त्रास व्हायला लागला. तिने याबद्दल विमान कर्मचाऱ्याला याबद्दलची माहिती दिली. फ्लाइट अटेंडेंटने तरूणीच्या त्रासामुळे तिला विमानातून बाहेर जाण्यास सांगितलं. बेथ त्रास होत असल्याने खूप रडत होती. एअरहोस्टेसचे प्रश्न तिला अजिबात आवडत नव्हतं. विमान कर्मचाऱ्यांनी बेथच्या दुखण्याकडे लक्ष दिलं नाही, असं मोरानने सांगितलं. 

बेथ व मोरान प्रवास करणार असलेल्या एमिरेट्स या विमान कंपनीने मात्र त्यांच्यावरील आरोप खोडून काढला. बेथला मेडिकल इमर्जन्सीमुळे विमानातून उतरविण्यात आल्याचे स्पष्टीकरण एमिरेट्सने दिलं. एका प्रवाशाला ठिक वाटत नसल्याचं विमान कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं होतं. बेथला त्रास होत असल्याने विमानातून उतरविण्यात आलं. तिला उपचार मिळावे, हा हेतू होता असं त्यांनी म्हंटलं.  

यासंपूर्ण प्रकरणावर इव्हेंसने म्हंटलं की, मला जबरदस्तीने विमानातून उतरविण्यात आलं. दुबईला जाण्यासाठी मला पुन्हा तिकिट काढावं लागलं. ज्यासाठी माझा 22 हजार 768 रूपये पुन्हा खर्च झाला. दरम्यान, विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडली तर त्याला विमानातून जाण्याची अनुमती दिली जाते, असं एमिरेट्सने म्हंटलं.