शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

Pakistan floods: पाकिस्तानात पुरामुळे हाहाकार; 1300 जणांचा मृत्यू, संसर्ग पसरण्याचा धोका, 12.5 अब्ज डॉलरचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 09:04 IST

Pakistan floods: आज पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की, देशाचा एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्यात सापडला आहे.

पाकिस्तानमध्ये (Pakistan)पुरामुळे (Floods) हाहाकार माजला आहे. मुसळधार पाऊस (Rain) आणि महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आतापर्यंत एकूण 1300 लोकांचा मृत्यू (Death) झाल्याचे सांगण्यात आहे. तसेच, पुरामुळे आता संक्रमणाचा (Infection) धोका वाढला आहे. संक्रमणामुळे होणारे रोग पसरू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न तीव्र केले आहेत. याशिवाय, पाकिस्तानची आर्थिक स्थितीही (Pakistan Economic Situation)  कोलमडली आहे. या पुरात पाकिस्तानचे 12.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर अनेक लोकांना कॅम्प आणि मदत छावण्यांमध्ये राहण्यास भाग पडले आहे. आज पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की, देशाचा एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करणे हे पाकिस्तानसमोरील सर्वात मोठे आव्हान आणि गरज आहे. सिंधचा परिसर पुरामुळे प्रभावित झाला आहे. जनतेसमोर अन्न व पाण्याचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारी मदत हाच त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे.

संक्रमणाचा वाढता धोकायाचबरोबर, पुराचे पाणी जसजसे कमी होत आहे, तसतसे याठिकाणी रोगराई देखील पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये डॉक्टरांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. छावणीत राहावे लागलेले लोकही अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजारही पसरत आहेत. या आजारांचा सर्वाधिक बळी लहान मुले होत आहेत. प्रांतातील निवारा शिबिरांमध्ये किमान 47,000 गर्भवती महिला होत्या. वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे होणारे आजार रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

आर्थिक परिस्थिती कोलमडलीमहापुरामुळे  (Flood) देशाचा एक तृतीयांश भाग बुडाला आहे आणि 33 मिलियनहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. आधीच डळमळलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला (Economy) 12.5 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, महागाई दर (Inflation Rate)  24 टक्क्यांवरून 27 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि चालू आर्थिक वर्षात तो 30 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. याशिवाय, गरिबी (Poverty) आणि बेरोजगारी (Unemployment) 21.9 टक्क्यांवरून 36 टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :floodपूरPakistanपाकिस्तान