शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंशत: व्यवसाय सुरु करण्याची अमेरिकेत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 04:05 IST

रुतलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत चाचपणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

वॉशिंग्टन : भारतामधील अनेक राज्ये लॉकडाऊन वाढविण्याच्या मानसिकतेत असताना जगभरात सर्वाधिक कोरोना बाधितांची (कोविड-१९) संख्या असलेल्या अमेरिकेत मात्र कोणते व्यवसाय सुरूकरता येईल, याबाबत विचार करण्यात येत आहे. अनेक राज्यांनी प्रभावित क्षेत्रानुसार अंशत: व्यवसाय आणि व्यापार सुरू करण्याची तयारी केली आहे. रुतलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत चाचपणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील केशकर्तनालय, कपड्यांची दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपत आहे. पंतप्रधानांनी राज्यांना लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली आहे. पंतप्रधानांनी नुकताच देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्या वेळी अनेकांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केल्याचे समजते.जगभरात सर्वाधिक १० लाखांहून अधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. येथील अनेक राज्यांनी मात्र निर्बंध कसे शिथिल करता येतील, याबाबत चाचपणी सुरू आहे. अमेरिकेत सर्वाधित बाधित न्यू यॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमधील कमी बाधित असलेल्या भागामध्ये १५ मेनंतर निर्बंध शिथिल करता येतील का, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. जॉर्जियाने निर्बंध शिथिल करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. लुझियानामधे पहिल्या टप्प्यात काही व्यवसाय सुरू होणार आहेत. मेरीलँडमध्ये पहिल्या टप्प्यात लघु व्यवसाय, रेस्टॉरंट आणि कमी धोका क्षेत्रातील उद्योग सुरू केले जातील. पेनसिल्वियानामधे ८ मेपासून लाल, पिवळा आणि हिरव्या क्षेत्रानुसार निर्बंध शिथिल केले जातील. अमेरिकेतील यूएसए टुडे या आघाडीच्या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प