शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संसद की बॉक्सिंगची रिंग, खासदारांनी एकमेकांवर लगावले ठोसे, तुर्कीएच्या संसदेत रणकंदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:18 IST

Turkish parliament News : संसद, विधिमंडळ यांसारख्या सभागृहात गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. अधिवेशनाचं बरंचसं कामगाज या गदारोळामुळे वाया जातं. मात्र शुक्रवारी तुर्कीएच्या संसदेमध्ये जे काही घडलं ते पाहून सारेच अवाक् झाले.

संसद, विधिमंडळ यांसारख्या सभागृहात गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. अधिवेशनाचं बरंचसं कामगाज या गदारोळामुळे वाया जातं. मात्र शुक्रवारी तुर्कीएच्या संसदेमध्ये जे काही घडलं ते पाहून सारेच अवाक् झाले. तुर्कीएच्या  संसदेमध्ये शुक्रवारी सभासदांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकमेकांना तुफान धक्काबुक्की केली. यादरम्यान, काही खासदारांनी मध्ये पडून बचाव करण्याचाही प्रयत्न केला. या मारहाणीदरम्यान, काही महिला खासदारांनाही दुखापत झाली. काही ठिकाणी संसदेच्या फरशांवर रक्ताचा सडा पडल्याचंही दिसून आलं. 

हा संपूर्ण वाद विरोधी पक्षांच्या उपनेत्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर सुरू झाला. या नेत्याने सरकारविरोधी आंदोलनाचा कट रचल्याच्याआरोपाखाली तुरुंगवास भोगलेल्या आणि नंतर खासदार म्हणून निवडून आलेल्या सहकाऱ्याला संसदेत प्रवेश मिळावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, तुर्कीएच्या संसदेत झालेल्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये सत्ताधारी एकेपीचे खासदार पोडियमवर उभ्या असलेल्या अहमत सिक यांना बुक्का मारण्यासाठी जाताना दिसत आहेत. त्यानंतर इतरही अनेक खासदारांनी या मारहाणीमध्ये उडी घेतल्याचं दिसत आहे. तर काही खासदार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या या गोंधळात किमान दोन खासदारा गंभीररीत्या जखमी झाले. त्यामुळे संसदेचं कामकाज थांबवावं लागलं.

सत्ताधारी एकेपीचे सदस्य अल्पे ओजालान यांनी टीआयपीचे खासदार अहमत सिक यांच्यावर हल्ला केला. सिक यांनी केन अताले यांना सरकारकडून देण्यात येत असलेल्या वागणुकीचा निषेध केला होता. ते म्हणाले होते की, तुम्ही अताले यांना दहशतवादी म्हणता, ही काही आश्चर्याची बाब नाही आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की, या देशातील सर्वात मोठे दहशतवादी त्या बाकांवर बसलेले आहेत.  दरम्यान, ओजालान  हे  मंचावर आले आणि त्यांनी सिक यांना धक्का देऊन खाली पाडले, अशी माहिती संसदेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय