शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

धार्मिक झुंडशाहीपुढे पाकची शरणागती!, लष्कराची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 5:12 AM

रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली.

इस्लामाबाद : रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली. लष्कराच्या मध्यस्थीने रविवारी रात्री सरकार व निदर्शक यांच्यात झालेल्या लेखी समझोत्यानुसार, कायदामंत्री झाहीद हमीद यांनी राजीनामा दिला. इतकेच नव्हे, तर गेल्या १५ दिवसांत अटक केलेल्या सर्व निदर्शकांनासोडून देताना परतीच्या प्रवासाच्या खर्चासाठी सरकारकडून प्रत्येकीएक हजार रुपयांचा चेकही दिला गेला!तिथे ८ नोव्हेंबरपासून धरणे धरून बसलेल्या निदर्शकांना जबरदस्तीने हुसकावण्यासाठी पोलीस व अन्य सुरक्षा दलांनी शनिवारी जोरदार कारवाई सुरू केली. त्या वेळीमोठा हिंसाचार व जाळपोळझाली. त्यात एका पोलीस अधिकाºयासह सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय २०० हूनअधिक निदर्शक व सुमारे ८० पोलीस जखमी झाले. याचेतीव्र पडसाद पाकिस्तानच्याप्रमुख शहरांत उमटले वतेथेही आंदोलनाचे लोण पेटले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव ठेवून पोलीस कारवाई स्थगित केली गेली.या समझोत्यानुसार दिलेली आश्वासने सरकार पाळेल, याची हमी लष्कराने दिली. देशाला संभाव्य विनाशकारी परिस्थितीतून वाचविल्याबद्दल या समझोतापत्रात लष्करप्रमुख जनरल कमर अब्दुल बाजवा यांचे विशेष आभार मानले गेले. (वृत्तसंस्था)मोहम्मद पैगंबरांच्या प्रतिष्ठेसाठी...पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यानुसार पूर्वी निवडणूकलढविणाºया आणि नंतर सत्तेच्या पदावर येणाºया प्रत्येक उमेदवारास मोहम्मद पैगंबरांच्या अंतिम प्रेषित्वाशी बांधिलकीची शपथ (खातम-ई-नबुव्वत) घ्यावी लागे. पण सरकारने नव्या कायद्यातून ही शपथ वगळली आहे.यासाठी कायदामंत्री हमीद यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी तहरीक-ई-लबैक या रसूल अल्ला, तहरीक-ई-खातम-ई-नबुव्वत आणि सुन्नी तहरीक इत्यादी धार्मिक पक्षांनी हे आंदोलन पुकारले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIslamइस्लाम