पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह बाहेरच्या देशातही भारतीयांनी पाकिस्तानविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यासाठी भारतीय समुदायाचे लोक आलेले पाहून पाकिस्तानी अधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
पहलगाम हल्ल्याचा शांततेत निषेध करण्यासाठी भारतीय विद्यार्थी आणि समुदायातील सदस्य लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर जमले होते. निषेध पाहून पाकिस्तान संतप्त झाला आणि उच्चायुक्तालयातून बाहेर पडताना पाकिस्तानच्या संरक्षण अटॅचेने 'अभिनंदन' यांचा चहा पितानाचा फोटो दाखवला आणि हातवारे करुन त्यांचा गळा कापण्याचा इशारा केला.
लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आणि २६ जणांच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला. भारतीय झेंडे, बॅनर आणि फलक हातात घेऊन, भारतीय समुदायाच्या सदस्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.
लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करत भारतीय समुदायाने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. आणि २६ जणांच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला. भारतीय झेंडे, बॅनर आणि फलक हातात घेऊन, भारतीय समुदायाच्या सदस्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.
निदर्शकांनी 'भारत माता की जय' आणि 'पाकिस्तान मुर्दावाद' अशा घोषणा दिल्या आणि 'मी हिंदू आहे' असे लिहिलेले पोस्टर हातात घेतले. निदर्शकांनी पाकिस्तानवर भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लपवून ठेवल्याचा आणि मदत केल्याचा आरोप केला.
'पहलगाम हल्ला हा हमासच्या हल्ल्यासारखाच'
यावेळी एका निदर्शकाने सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन दिले आहे, म्हणूनच पहलगाममध्ये आपले २६ लोक मारले गेले. आम्ही या विरोधात निषेध करण्यासाठी येथे जमलो आहोत. ब्रिटनमध्ये राहणारा संपूर्ण भारतीय समुदाय या भयानक हल्ल्यामुळे दुःखी आहे.