पाकिस्तानच्या बलुच प्रांतात ११ मार्च रोजी जाफर एक्सप्रेस ट्रेन बलुच बंडखोरांनी हायजॅक केल्याची घटना समोर आली होती. बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी त्यांनी ट्रेनचे अपहरण केले आणि अनेक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले, असं म्हटले होते. त्यांचा हा दावा पाकिस्तानने खोडून काढला होता. पाकिस्तानने ३० बलुच सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. पाकिस्तानने त्यांच्या सैनिकांच्या मृत्युची संख्या जाहीर केलेली नाही. म्हणूनच बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे.
VIDEO: २४ वर्षांनी भेटलेल्या बाप-लेकाची कडकडून मिठी; हा प्रसंग पाहून तुम्हीही व्हाल भावनिक
दरम्यान, आता सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रेनमधून वाचलेल्या लोकांनी अनेक पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. यामुळे आता पाकिस्तानची पोलखोल झाली आहे.
जाफर एक्सप्रेस ही क्वेट्टा आणि पेशावर दरम्यान धावणारी एक प्रमुख प्रवासी ट्रेन आहे. ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते प्रवासाला निघाली. ट्रेनमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते, यात नागरिकांसह पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी आणि सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी होते. बोलान जिल्ह्यातील मशकाफ भागात बीएलएच्या दहशतवाद्यांनी बोगद्यात रेल्वे ट्रॅक उडवून दिल्यानंतर ट्रेन थांबली. त्यानंतर लगेचच हल्लेखोरांनी ट्रेन ताब्यात घेतली आणि प्रवाशांना ओलीस ठेवले.
बीएलएचे प्रवक्ते झायेद बलोच यांनी दावा केला की, ही कारवाई त्यांच्या माजीद ब्रिगेड, फतेह स्क्वॉड आणि इतर विशेष युनिट्सनी संयुक्तपणे केली. हल्ल्यादरम्यान ट्रेन चालकाला गोळी लागली आणि अनेक प्रवाशांनी सांगितले की हल्लेखोर ट्रेनमध्ये घुसले, लोकांची ओळखपत्रे तपासली आणि लष्करी कर्मचाऱ्यांना वेगळे केले. बीएलएने महिला, मुले आणि बलुच नागरिकांना सोडण्यास सहमती दर्शविली पण लष्करी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले.
पाकिस्तानचा मोठा दावा
या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने तातडीने बचाव कार्य सुरू केले. लष्कराने स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडो, फ्रंटियर कॉर्प्स आणि हवाई दल तैनात केले. १२ मार्चच्या रात्री, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दावा केला की, ही कारवाई यशस्वी झाली, यामध्ये ३३ BLA सैनिक मारले गेले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांनी कबूल केले की या काळात २१ प्रवासी आणि ४ सैनिक मारले गेले. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याला "घृणास्पद दहशतवादी हल्ला" असे वर्णन केले आणि लष्कराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पण या दाव्यानंतर काही तासांतच परिस्थितीने एक नवीन वळण घेतले.
बीएलएने लष्कराचे दावे फेटाळून लावले. 'कारवाई पूर्णपणे अपयशी ठरली. संघटनेने दावा केला आहे की त्यांच्या लढाऊंनी आतापर्यंत ५० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे आणि १५० हून अधिक ओलिस अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकारने त्यांच्या मागण्यांवर वाटाघाटी करण्याऐवजी लष्करी कारवाई सुरू केली, याच्या प्रत्युत्तरात त्यांनी अनेक सैनिकांना ठार मारले. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये, बीएलएने ट्रेनच्या आतील फोटो दाखवल्याचा दावा केला आहे, यामध्ये सैनिकांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे.