शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या विमानासाठी पाकचे निर्बंध शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 07:35 IST

हवाई क्षेत्र : बिश्केक येथील शांघाय सहकार्य परिषदेत मोदी होणार सहभागी

लाहोर : किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान आपल्या हवाई हद्दीतून जाऊ देण्यास परवानगी देण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. १३ व १४ जून रोजी बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर बैठकीसाठी मोदी जाणार आहेत. मध्य आशियातील त्या शहरात जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग पाकिस्तानवरून जातो. परंतु २६ फेब्रुवारी रोजी भारताने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केल्यापासून पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून जाणारेसर्व हवाईमार्ग बंद करून ठेवले आहेत.

मोदींच्या विमानास बिश्केक येथे जाण्यासाठी हे निर्बंध शिथिल करून परवानगी द्यावी, अशी विनंती भारताने पाकिस्ताननेन केली होती. पाकिस्तानच्या हवाई निर्बंधबाबतच्या या निर्णयास भारतही सकारात्मक प्रतिसाद देईल.  व उभय देशांमधील सर्व वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा प्रस्ताव मान्य करेल, अशी अपेक्षाही या अधिकाºयाने व्यक्त केली. ‘एससीओ’ शिखर परिषदेसाठी इम्रान खानही जाणार आहेत. परंतु तेथे त्यांची व मोदींची स्वतंत्रपणे भेट होण्याचा सध्या तरी कोणताही कार्यक्रम नाही. औपचारिकतेनंतर भारताला कळवणार!पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भारताची ही विनंती मान्य करण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. काही औपचारिकता पूर्ण झाल्यावर भारतास तसे अधिकृतपणे कळविले जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान