शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan: आता अक्कल ठिकाणावर आली! पाकिस्तान म्हणे, पुढची १०० वर्षे भारताच्या वाकड्यात जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 10:14 IST

Pakistan to launch new security policy: गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे.

इस्लामाबाद : गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आणि महागाईच्या विळख्यात पुरता कंगाल झालेल्या पाकिस्तानी नेत्यांनी आता परराष्ट्र नीती ठरविली आहे. यामध्ये पाकिस्तान शेजारी देशांशी शांतता आणि आर्थिक कूटनीतीला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.

१०० पानांच्या या राष्ट्रीय सुरक्षा नीतीमध्ये भारतासोबत काश्मीरमुद्द्यावर अंतिम तोडगा काढत व्यापार आणि व्यवसायीक नात्याला पुढे नेले जाईल. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरवरून तणाव आहे. यामुळे व्यापारी आणि आर्थिक संबंध खराब झाले आहेत. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने एक्‍सप्रेस ट्रिब्‍यूनला मुलाखत देताना म्हटले की, आम्ही पुढील १०० वर्षे तरी भारतासोबर दुष्मनी करणार नाही. ही नवीन नीती शेजारी देशांशी शांतता राखण्यावर आहे. जर काश्मीर मुद्द्यावर चर्चा आणि प्रगती झाली तर भारतासोबत पूर्वीसारखे व्यापारी संबंध होण्याची शक्यता आहे. 

पाकिस्तानने आपल्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात म्हटले आहे की ते आता भू-रणनीतीऐवजी भू-अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करेल. पाकिस्तानच्या धोरणांमधील या बदलामुळे भारतासोबतच्या संबंधांमधील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानला हे सांगणे सोपे पण करणे अवघड असल्याचे भारतीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये आर्थिक सुरक्षा हा कळीचा मुद्दा असेल, असे पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, या बदलानंतरही, भारतासोबतचा काश्मीर वाद हा पाकिस्तानसाठी "महत्त्वाचे राष्ट्रीय धोरण" म्हणून ओळखला गेला आहे.

पण मोदींच्या काळात अशक्य...नवी दिल्लीत सध्याच्या मोदी सरकारच्या काळात भारतासोबत समेट होण्याची शक्यता नसल्याचेही पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा शुभारंभ करणार आहेत. पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा फक्त एक भाग सार्वजनिक करेल, बाकीचा भाग गोपनीय ठेवला जाईल. हे सुरक्षा धोरण बनवण्यात पाकिस्तानी लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर विरोधक गदारोळ माजवू शकतात, असे मानले जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर