शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिक्समध्ये भारताचा दबदबा पाहून आपल्याविरोधात कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानची चीनकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:48 IST

दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आल्याने, एकीकडे भारताचा हा विजय झाला असताना पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढल्या आहेत

बीजिंग, दि. 7 - दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आल्याने, एकीकडे भारताचा हा विजय झाला असताना पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद आसिफ यासंबंधी चर्चा करण्यासाठी चीनचा दौरा करणार आहेत. गुरुवारी परराष्ट्रमंत्री  मोहम्मद आसिफ चीनला जाणार आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोषणापत्रात उल्लेख करण्यात आलेल्या गोष्टींवर कशाप्रकारे अंमलबजावणी करु शकतो यासंबंधी चीन चर्चा करु इच्छित आहे. तसंच अंमलबजावणी करत असताना चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरला धक्का लागू नये याकडे चीनचं लक्ष आहे. पाकिस्तानने ब्रिक्स घोषणापत्राचा विरोध केला असून यासंबंधी आपला मित्र चीनकडे तक्रार करणार आहे. 

आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने याआधीच चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाही पाकिस्तानने आपला हेका कायम ठेवला आहे.

चीनच्या शीयामेन शहरात सोमवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व प्रकारच्या दहशतवादाची निंदा करणारा ४३ पानी जाहीरनामा जारी केला होता. पाकिस्तानसह अन्य देशांमधील दहशतवादी गटांपासून असलेल्या धोक्याबाबत चिंताही व्यक्त केली होती.

तालिबान, इस्लामिक स्टेट (इसिस), अल-कायदा, पूर्व तुर्किस्तान, उझबेकिस्तानमधील इस्लामी चळवळ तसेच हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए- तोयबा, जैश-ए- मोहम्मद, तेहरिक- तालिबान पाकिस्तान, हिज्ब-उत- तहरीर या अतिरेकी गटांनी चालविलेल्या हिंसाचारामुळे उपखंडातील सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याचा उल्लेखही या जाहीरनाम्यात करण्यात आला होता.

अफगाणिस्तानकडे अंगुलीनिर्देश...अतिरेक्यांसाठी अफगाणिस्तानातील ४० टक्के भूभाग सुरक्षित असल्याचे सांगत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी उपखंडातील हिंसाचारासाठी अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांना जबाबदार धरले होते. ब्रिक्स सदस्यांनी जारी केलेला जाहीरनामा आम्ही फेटाळत आहोत, असे त्यांनी संरक्षण स्थायी समितीच्या बैठकीत म्हटले होते. काही गट देश सोडून गेले त्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी गटांवर कारवाया केल्या आहेत, असा दावा दस्तगीर यांनी केल्याचे वृत्त जीईओ टीव्हीने दिले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन