शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट, देश चालवण्यासाठीही पैसा नाही; इम्रान खान यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:37 IST

सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं.

इस्लामाबाद : देशाची स्थिती अतिशय बिकट आहे. देश चालवायलाही पैसा नाही. लोक करही भरत नाहीत. त्यामुळे देश चालवण्यासाठी अन्य देशांकडून सतत कर्ज घ्यावे लागत आहे. विदेशी कर्ज आणि महसुलातील घट याचा राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होत आहे, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:हूनच दिली आहे. सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं. त्यामुळे महसूल गोळाच होत नाही. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी अन्य देशांकडे आपल्याला हात पसरावे लागत आहेत. आधीच्या सरकारांनी देशाला कर्जाच्या खाईत लोटले. त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.  राष्ट्रीय महसूल मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, आपल्या राजकारण्यांनी ब्रिटिशांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पाकिस्तानच्या पन्नास पट उत्पन्न असलेल्या ब्रिटनचे मंत्री परदेशातही इकॉनॉमी क्लासने जातात. देशाचा पैसा वाचवावा, यासाठी ते दूतावासात मुक्काम करतात.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था