शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव हेरच असल्याचा पाकिस्तानचा दावा, आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 20:51 IST

कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माधार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माधार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने आपली बाजू मांडली असून, कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर असल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर केला आहे. याआधी भारताने याप्रकरणात आपले म्हणणे सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडले होते.

पाकिस्तानमधील खासगी वृत्तवाहिनी असलेल्या जियो न्यूजने यासंदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नसल्याचा दावा पाकिस्तानने  खोडून काढला आहे. तसेच ते पाकिस्तानमध्ये आराजक माजवण्यासाठी आल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. तसेच कुलभूषण जाधव प्रकरण व्हिएन्ना करारांतर्गत येत नसल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.  कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून, निवृत्तीनंतर व्यावसायिक कामासाठी ते इराणला गेले असता, तिथे त्यांना पाकिस्तानने अटक केली होती. ते भारतासाठी हेरगिरी करीत असून, त्यांना बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला होता. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्यांच्या फाशीला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर पाकिस्तानने यासंदर्भात १३ डिसेंबर रोजी आपले म्हणणे सादर करावे, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार पाकिस्तानने आज आपली भूमिका मांडली. दरम्यान, कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा, अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती.  जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट होईल; पण तेव्हा तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचारीही उपस्थित राहतील. जाधव यांची पत्नी आणि आईला तिथे सुरक्षा पुरवली जाईल.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तान