शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

इराण युद्धामुळे पाकिस्तानची कंबर मोडली! पेट्रोल ३०० रुपये लिटर, पंपावर लागल्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:47 IST

आधीच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेवर आता इंध दरवाढीचा नवा बॉम्ब पडला आहे.

सध्या जगभरात इराण-इस्रायल युद्धाची चर्चा सुरू आहे. एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका हे देश प्रत्यक्ष युद्ध भूमीत उतरले असले तरी, दुसरीकडे या युद्धाची झळ इतर देशांना देखील लागली आहे. इराणने या युद्ध काळात होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध लादल्याने या मार्गाने होणारी तेल वाहतूक ठप्प झाली आहे. याचे परिणाम जगभरातील इतर देशांना भोगावे लागत आहे. तेलाची वाहतूक ठप्प झाल्याने तेल आणि इंधनाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. या सगळ्या दरम्यानच, भारताचा शेजारी देश अर्थात पाकिस्तानची आणखी कोंडी झाली आहे. 

अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्या युद्धात पाकिस्तानचे दिवाळे निघाले आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असतानाच आता पाकिस्तानवर आणखी एक संकट कोसळले आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेवर आता इंध दरवाढीचा नवा बॉम्ब पडला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी एक मोठा निर्णय घेत 'हाय-ऑक्टेन' इंधनावरील करात प्रचंड वाढ केली असून, आता हे इंधन ३०० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

एका झटक्यात २०० रुपयांची वाढ

पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लक्झरी गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हाय-ऑक्टेन इंधनावर यापूर्वी १०० रुपये प्रति लिटर लेव्ही आकारली जात होती, ती आता थेट २०० रुपयांनी वाढवून ३०० रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारला दरमहा ९ अब्ज रुपयांची बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे. हा पैसा सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी वापरला जाईल, असेही सरकारने म्हटले आहे.

पेट्रोल पंपांवर लोकांच्या उड्या

किंमती वाढणार असल्याची घोषणा होताच पाकिस्तानमधील प्रमुख शहरांतील पेट्रोल पंपांवर लोकांच्या रांगा लागल्या. महागडे तेल खरेदी टाळण्यासाठी नागरिक आपल्या गाड्यांच्या टाक्या भरून घेण्यासाठी धावपळ करताना दिसले. सध्या ही वाढ केवळ हाय-ऑक्टेन इंधनासाठी करण्यात आली असली, तरी सामान्य गाड्यांसाठी लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे जनता चिंतेत आहे.

युद्धाचा पाकिस्तानवर दुहेरी फटका

इराण युद्ध सुरू झाल्यापासून पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर सतत वाढत आहेत. ६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ५५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. याशियाय मंत्र्यांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. सरकारी गाड्यांसाठी मिळणाऱ्या इंधन भत्त्यात ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

इंधन वाचवण्यासाठी आठवड्यातून केवळ चार दिवस काम करण्याची तरतूद करण्यात आली असून, ५० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील ही परिस्थिती पाहता, इराण-इस्रायल युद्ध लांबल्यास तिथल्या नागरिकांचे जगणे अधिक कठीण होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War Cripples Pakistan: Petrol at ₹300/L, Panic Buying!

Web Summary : Iran-Israel conflict exacerbates Pakistan's economic woes. Fuel prices surge to ₹300/liter, triggering panic buying. Government increases taxes on high-octane fuel amidst broader austerity measures, including salary cuts and reduced workdays, signaling a dire economic situation.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrude Oilखनिज तेल