शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी ३० मेपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 01:14 IST

पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाहोर : पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैशच्या अतिरेकी तळावर भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे हल्ला केल्यानंतर पाकने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले होते. पाकने २७ मार्च रोजी एका निर्णयाद्वारे नवी दिल्ली, बँकॉक, क्वालालंपूर वगळता सर्व उड्डाणांसाठी हवाई हद्द खुली केली होती.एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले की, संरक्षण व उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. भारतीय उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द खुली करण्यावर फेरविचार करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठरल्यानुसार, पाकिस्तानची हवाई हद्द आता ३० मेपर्यंत भारतासाठी बंद राहील. आता भारतासाठी हवाई हद्द खुली करण्यावर ३० मे रोजी पुन्हा विचार करण्यात येईल.पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीस सांगितले होते की, भारतात निवडणुकांचे निकाल येईपर्यंत हवाई हद्द खोलण्याबाबतचा निर्णय ‘जैसे थे’ राहील. निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन होईपर्यंत भारत-पाक संबंधांमध्ये काही सुधारणा होईल, असे दिसत नाही. दोन्ही देशांतील एकमेकांच्या हवाई हद्दीतील बंदी भारतात नवे सरकार स्थापन होईपर्यंत कायम राहील, असे वाटते.भारताने पाकिस्तानला हवाई हद्दीची बंदी केल्यामुळे पाकने बँकॉक, क्वालालंपूरसाठीची उड्डाणे रद्द केली असून, त्यामुळे त्या देशाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून (पीआयए) क्वालालंपूरसाठी चार तसेच बँकॉक व दिल्लीसाठी दररोज प्रत्येकी दोन विमाने पाठवली जात होती. पीआयएच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, बँकॉक व क्वालालंपूरची उड्डाणे बंद झाल्यामुळे अब्जावधी रुपयांची झळ सोसावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर पाकला इतर एअरलाइन्सचे प्रवासीही गमवावे लागत आहेत. भारत- पाकिस्तानदरम्यान रस्ते व रेल्वे वाहतूक सुरू आहे, तर मग हवाई हद्द खुली करण्यात काय गैर आहे, असा सवालही या अधिकाºयाने केला.प्रवाशांना आर्थिक फटकापाकिस्तानची हवाई हद्द अत्यंत महत्त्वाच्या उड्डयन कॉरिडॉरमध्ये येते. त्यामुळे भारतात येणारी बहुतांश विमाने पाकच्या हवाई हद्दीतून येतात. या प्रतिबंधामुळे भारत व पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या दोन्ही देशांबरोबरच युरोप व इतर देशांनाही आर्थिक फटका बसत आहे. कारण विमान उड्डाणांचाही कालावधी वाढला आहे. त्यामुळे तिकिटेही महागली आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत