शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता अफगाणमध्ये प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 5:42 AM

भारतीय दूतावासावर हल्ले होण्याची भीती; सतर्क राहण्याचा इशारा

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बालाकोटवर भारतीय हवाई दलाने हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. त्यानंतर जैश-ए-मोहम्मदने आपले दहशतवादी प्रशिक्षण तळ अफगाणिस्तानमधील कुनार, नांगरहार, नुरिस्तान, कंदाहार प्रांतामध्ये हलविले आहेत. ही माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाल्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला चढविला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानातील तालिबानी, हक्कानी नेटवर्क यांच्याशी संगनमत करून आपले प्रशिक्षण तळ त्या देशात हलविले. लष्कर-ए-तोयबाचे नेते व त्यांच्याशी संलग्न असलेल्या पाच धर्मादाय संस्थांवर इम्रान खान सरकारने १ जुलै रोजी केलेली कारवाई हे नाटक असल्याचे मोदी सरकारचे मत आहे.

पाकिस्तान व अफगाणिस्तानला लागून असलेल्या ड्युरँड रेषेच्या भागात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हलविण्यात आले आहेत. फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

जैश-ए-मोहम्मदचा नेता हाजी अब्दुल साफी याच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गट काबूलमधील भारतीय दूतावासावर हल्ले चढविण्याची भीती आहे. कारी वारी गुल या दहशतवाद्याचा गट भारतीय दूतावासावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून आत्मघाती हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाली आहे. कंदाहारमधील भारतीय वकिलातीवर तालिबानी हल्ला चढविण्याची शक्यता आहे.

मसूद अझर पाकिस्तानात सुरक्षितपाकिस्तानातून जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानातील कोट, मोमंदरा (नांगरहार प्रांत), सनुगीन, मार्जा (हेल्मांड), लोगाना, नावा (गझनी), झुरमात (पक्तिता), कुनार, फर्याब, कुंदूज येथे गेले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर याला अफगाणिस्तानमध्ये आश्रय देण्याची तयारी हक्कानी नेटवर्कने गेल्या फेब्रुवारी महिन्यात दाखविली होती.मात्र, पाकिस्तानी लष्कराच्या नजरेखाली भवालपूर येथे आपण सुरक्षित असल्याचे अझरला जाणवले. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने जानेवारी महिन्यात जैश-ए-मोहम्मदच्या सादिक अकबर, अतुल्ला या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यावेळी या संघटनेच्या त्या देशातील वाढत्या कारवायांचा खºया अर्थाने सुगावा लागला होता. या दोघांनी भवालपूर, बालाकोटमधील दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण घेतले होते.

टॅग्स :terroristदहशतवादी