शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघड! इराणी डेथ स्क्वॉडचा पाकिस्तानी हस्तक अमेरिकेत दोषी; खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 17:41 IST

अमेरिकन सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई, आसिफ मर्चंटचा डाव उधळला

Asif Merchant: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर बड्या नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. इराणच्या सांगण्यावरून हा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी केला आहे.

काय होता नेमका कट?

२०२० मध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईत इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते. या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेतील महत्त्वाच्या नेत्यांना संपवण्याची योजना आखली होती. या योजनेनुसार आसिफ मर्चंट याने २०२४ मध्ये अमेरिकेत जाऊन यासाठी माणसे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता.डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन, निक्की हेली आरोपीच्या लक्ष्यावर होत्या.

इराणी गुप्तचर यंत्रणेचा हात? 

फेडरल प्रॉसिक्युटर्सच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण कट इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या एलिट दलाने आखला होता. आसिफ मर्चंटवर पैशांसाठी हत्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एप्रिल २०२४ मध्ये आसिफ मर्चंटने या कामात मदत करण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. मात्र, त्या व्यक्तीने वेळीच अमेरिकन सुरक्षा यंत्रणांना सावध केले आणि तो स्वतः गुप्त खबऱ्या बनला. यामुळे मर्चंटचा डाव फसला आणि कोणताही हल्ला होण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.

आरोपीचा बचावात्मक पवित्रा 

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान मर्चंटने कबुली दिली की, त्याने रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या सदस्यांशी हातमिळवणी केली होती. मात्र, त्याने असा दावा केला की, तेहरानमध्ये असलेल्या आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी दबावाखाली त्याने हे पाऊल उचलले होते. आपल्याला कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला मारण्याचा थेट आदेश मिळाला नव्हता, असेही त्याने न्यायालयात सांगितले.

युद्धाच्या सावटाखालील खटला हा खटला अशा वेळी समोर आला आहे जेव्हा इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध पेटले आहे. इराणच्या राजदूतांच्या मते, नुकत्याच झालेल्या हल्ल्यात १,३३२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कुवेतमध्ये झालेल्या हल्ल्यात सहा अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत, तर इस्रायलमध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iranian plot to assassinate Trump foiled; Pakistani man convicted in US.

Web Summary : A Pakistani man was convicted in the US for plotting to assassinate Donald Trump on Iran's orders. The plot involved recruiting individuals in the US. The man admitted to working with Iranian Revolutionary Guards, citing pressure to protect his family.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन