शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:37 IST

पाकिस्तान सध्या महागाई, बेरोजगारी आणि कर्जाच्या गर्तेत अडकलेला असतानाही, तेथील नेत्यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली आहे.

पाकिस्तान सध्या महागाई, बेरोजगारी आणि कर्जाच्या गर्तेत अडकलेला असतानाही, तेथील नेत्यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकताच एक निर्णय घेतला असून, त्यावरून सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय आणि सिनेट अध्यक्षांच्या पगारात मोठी वाढस्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष अयाज सादिक आणि सिनेटचे अध्यक्ष युसूफ रझा गिलानी यांच्या मासिक वेतनात तब्बल ५०० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे मासिक वेतन आता १३ लाख पाकिस्तानी रुपये इतके झाले आहे, जे पूर्वी केवळ २.०५ लाख रुपये होते. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू असणार आहे.

मागील काही महिन्यांत अनेक नेत्यांचे पगार वाढले!या निर्णयापूर्वीही शरीफ सरकारने नेत्यांच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. मार्च २०२५ मध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि विशेष सल्लागारांच्या वेतनात १८८ टक्के वाढ करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, खासदार आणि सिनेटर यांचा मासिक पगार ५.१९ लाख रुपयांवर नेण्यात आला होता.

सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर जनतेचा रोषपाकिस्तानमधील नागरिकांना यामुळे संताप अनावर झाला आहे. इस्लामाबादमधील एका रहिवाशाने म्हटले की, “एकीकडे सरकार साधेपणाचे गोडवे गाते आणि दुसरीकडे आपलेच पगार पाचपट वाढवते. कराचा बोजा मात्र सामान्य जनतेवरच.”

पंतप्रधान शरीफ जेव्हा सत्तेत आले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात २१ मंत्री होते. आता ही संख्या वाढून ५१ झाली आहे. या वाढलेल्या मंत्रिमंडळावरही खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची याचना आणि देशांतर्गत खर्चाची विसंगतीहे सर्व घडत असताना पाकिस्तानचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेकडून मदतीची मागणी करत आहे. त्यामुळे आर्थिक तज्ज्ञ आणि टीकाकार प्रश्न विचारत आहेत की, जर हीच आर्थिक सुधारणा असेल, तर पाकिस्तानला सावरायला अधिक वेळ लागणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान